Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 : कर्णधाराकडून टीमचा विश्वासाला तडा, पुढच्या हंगामात पत्ता कट?

अरेरे! याला म्हणतात स्वत: पायावर धोंडा मारून घेणं, मिळालेल्या संधीचं सोनं नाही तर मातीच केली? तुम्हाला काय वाटतं?

IPL 2022 : कर्णधाराकडून टीमचा विश्वासाला तडा, पुढच्या हंगामात पत्ता कट?

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नामांकित टीमचा धूळ चारून नव्या टीमने बाजी मारली. दोन नव्या टीमने अक्षरश: 4 ते 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या टीमचा बाजार उठवला. यंदाच्या हंगामात नवे खेळाडू छावे ठरले आणि जुने खेळाडू मात्र फ्लॉप किंवा तेवढी चांगली कामगिरी करताना दिसले नाहीत. 

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पंजाबला जाता आलं नाही. पंजाबच्या कर्णधाराचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. मयंक अग्रवालची कामगिरी फारच निराशाजनक राहिली आहे. मयंक अग्रवालकडे पंजाबने कर्णधारपद सोपवलं होतं. 

मयंक अग्रवाल फलंदाज म्हणून आणि त्यासोबत कर्णधार म्हणूनही फ्लॉप ठरला. त्याची कामगिरी वाईट ठरली. त्याने पंजाब फ्रान्चायझीला निराश केलं. त्यामुळे पुन्हा मयंक अग्रवालला पंजाब संधी देईल की नाही याबाबत शंका आहे. 

मयंकने पंजाबचा भरवसा तोडला आहे. तो कर्णधार म्हणून टीमला यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्यात अपयशी ठरला. मयंकची फलंदाजी आणि कर्णधारपद दोन्हीवर टीका होत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी त्याच्याकडून दोन्ही गोष्टी काढून घेतल्या जाऊ शकतात. 

मयंकने 13 सामन्यात जेमतेम 196 धावा केल्या आहेत. टीमसाठी मयंक अत्यंत धोक्याचा खेळाडू ठरला. त्याची एकूण कामगिरी पाहता पुढच्या वर्षी पंजाब त्याला रिलीज करेल अशी दाट शक्यता आहे.

Read More