Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

दिल्ली टीममधील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, IPL वर कोरोनाचं संकट

आताची सर्वात मोठी बातमी| मॅच तोंडावर असताना कोरोनामुळे पूर्ण टीम क्वारंटाईन 

दिल्ली टीममधील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, IPL वर कोरोनाचं संकट

मुंबई: आयपीएलवर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे सामने स्थगित करावे लागले होते. यावर्षी मात्र सामने स्थगित न करता कमी खेळाडूंवरही सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच दरम्यान आता दिल्ली टीमला मोठा धक्का बसला आहे. 

कडक बायोबबल असूनही दिल्ली टीममधील एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. 20 एप्रिल रोजी दिल्लीची पुढची मॅच आहे. तोंडावर मॅच असताना खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने दिल्ली टीमचं टेन्शन वाढलं.

दिल्लीची पुढची मॅच पुण्यात आहे. मात्र सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी होणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

याआधी फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली होती. आता टीममधील खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. सर्व खेळाडूंची दोन दिवस RT-PCR चाचणी होणार आहे. 

Read More