Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

दिल्लीचा पराभव गुजरातसाठी धक्का, राजस्थान Point Table मध्ये पहिल्या नंबरवर

शेजाऱ्यांनी बळकावलं स्थान आता गुजरातची गोची, पाहा पॉईंट टेबलवरचं बदलेलं समीकरण

दिल्लीचा पराभव गुजरातसाठी धक्का, राजस्थान Point Table मध्ये पहिल्या नंबरवर

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 35 सामने जवळपास झाले आहेत. मुंबई आणि चेन्नई टीम प्ले ऑफमधून बाहेर जाणार हे जवळपास निश्चित होत असताना आता राजस्थाननं आपल्या शेजारी असलेल्या गुजरात टीमला मोठा धक्का दिला आहे. 

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात राजस्थानने 15 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत राजस्थान टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. पॉईंट टेबलवरची समीकरण पूर्ण बदलली आहेत. 

राजस्थान टीम 7 सामने खेळून त्यापैकी 5 जिंकली आहे. पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर गुजरात टीम आहे. तर तिसऱ्या स्थानावर बंगळुरू आहे. गुजरातने 6 पैकी 5 तर बंगळुरूने 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. 

तिसऱ्या स्थानावर लखनऊ टीम आहे. लखनऊने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. पाचव्या स्थानावर हैदराबाद टीम आहे. सहाव्या स्थानावर दिल्ली टीम आहे. पहिल्या 3 मघ्ये असलेली कोलकाता टीम थेट 7 व्या स्थानावर पोहोचली आहे. 

Read More