Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार... का होतोय पराग ट्रोल

रियान परागने असं का केलं? पाहा व्हिडीओ त्याची ही कृती तुम्हाला तरी पटली का?

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार... का होतोय पराग ट्रोल

मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामात बिहू डान्समुळे चर्चेत आलेला रियान पराग यंदाच्या हंगामात चांगलाच ट्रोल झाला. आधीच फ्लॉप शो आणि त्यामध्ये त्याचा बालिशपणा यामुळे क्रिकेटप्रेमींनी त्याला चांगलंच ट्रोल केलं. 

राजस्थान विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात रियान पराग अजब सेलिब्रेशन करताना दिसला. खरं तर रियानच्या दृष्टीनं ते सेलिब्रेशन होतं. मात्र ट्रोलर्सना तो बालिशपणा वाटला. अनेक ट्रोलर्सनी त्याला सुधारण्याचाही सल्ला दिला. तर काहींनी हे सोडून कामगिरीकडे लक्ष दे असंही म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

रियाने परागने कॅच पकडला. कॅच आऊट केल्याचा आनंद साजरा करताना त्याने बॉल जमिनीला लावल्याचं दिसत आहे. मात्र रियानने तो जमिनीला लावला नाही तशी फक्त अॅक्शन केली. रियानला खेळाडू कॅच आऊट झाल्याचं सांगायचं होतं. त्याचं अजब सेलिब्रेशन मात्र चर्चेचा विषय ठरलं.

रियानच्या या कृतीमागचं नेमकं काय कारण?

रियानने याआधी एक कॅच पकडला होता. मात्र तो कॅच आऊट देण्यात आला नाही. याचं कारण म्हणजे तो जमिनीवर टप्पा पडून बॉल कॅच केल्याचं DRS मध्ये समोर आलं. त्यामुळे रियानने घेतलेल्या कॅचला आऊट देण्यात आलं नव्हतं. 

त्यानंतर रियानने घेतलेल्या कॅचवर केलेलं सेलिब्रेशनवर टिका केली जात आहे. त्याच्या या कृतीवर कोणीच खूश नव्हतं. त्याच्यावर सोशल मीडियावरही खूप टिका होत असल्याचं दिसत आहे. 

राजस्थानने जिंकला सामना

राजस्थान टीमने लखनऊवर 24 धावांनी मात केली. त्यामुळे प्लेऑफचे चान्सेस वाढले आहेत. राजस्थानने पहिल्यांदा बॅटिंग करून 178 धावा केल्या. तर लखनऊसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र लखनऊ टीम 20 ओव्हरमध्ये 154 धावांवर तंबुत परतली. 

Read More