Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 मध्ये काळजाचे ठोके पुन्हा वाढवणार 'ती' मिस्ट्री गर्ल; पाहा तिचं नाव, गाव आणि...

आयपीएल म्हणजे फक्त क्रिकेटच नव्हे तर हा मनोरंजाचाही महाकुंभ 

IPL 2022 मध्ये काळजाचे ठोके पुन्हा वाढवणार 'ती' मिस्ट्री गर्ल; पाहा तिचं नाव, गाव आणि...

मुंबई : यंदाच्या वर्षी आयपीएल सुरु होण्याआधीपासूनच त्यासंदर्भातली प्रत्येक माहिती क्रीडारसिकांचं लक्ष वेधणारी ठरत आहे. खेळाडूंवर लागलेल्या बोलीपासून ते अगदी त्यांच्या संघातील स्थानापर्यंत सर्वकाही तुफान वेगानं व्हायरल होताना दिसत आहे. (IPL 2022)

आयपीएल म्हणजे फक्त क्रिकेटच नव्हे तर हा मनोरंजाचाही महाकुंभ आहे, असं म्हणायला हरकत नाही. यंदाच्या वर्षी सनरायजर्स हैदराबाद या संघाकडून क्रीडारसिकांना प्रचंड अपेक्षा आहेत. 

अशाच अपेक्षा संघाची सीईओ काव्या मारन हिलाही असणार आहेत. काव्या यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा तिच्या संघाला प्रोत्साहित करताना दिसत आहे. 

मागील वर्षी काव्या आयपीएलच्या निमित्त सर्वांसमोर आली आणि ही सुंदरा आहे तरी कोण, हाच प्रश्न अनेकांना पडला. 

काव्या मारन (Kaviya Maran) ही सन ग्रुप (Sun Group) चे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सनरायजर्स हैदराबाद (SRH) हा तिचाच संघ आहे. काव्या माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांची भाचीही आहे. 

fallbacks

fallbacks

28 वर्षीय काव्या स्वत:सुद्धा सन म्युझिकशी जोडली गेली आहे. पहिल्यांदा ती IPL 2018 मध्ये हैदराबादच्या संघाला चिअर करताना दिसली होती. 

fallbacks

एमबीएचं शिक्षण घेतल्यानंतर तिनं वडिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यास सुरुवात केली. कंपनीमध्ये कोणत्याही मोठ्या पदावर काम करण्याआधी तिनं सन टीवीमध्ये इंटर्नशिपही पूर्ण केली होती. 

सध्या काव्या सन टीवीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या Sun NXT ची प्रमुख आहे. 

Read More