IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी सर्व दहा संघ सज्ज झाले आहेत. या हंगामात काही संघांचे कर्णधारही बदलले आहेत. तर काही संघांनी नव्या हंगामासाठी नव्या जर्सी लाँच केल्या आहेत. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादने काही दिवसांपूर्वीच नवी जर्सी लाँच केलीय. यात आता दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Captils) भर पडली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 साठी नवी जर्सी लाँच (Deli Revealed New Jersey) केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नव्या जर्सीचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. दिल्लीची नवी जर्सी लाल आणि निळ्या रंगात आहेत. जर्सीच्या डाव्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सचा लोगो आहे. तर जर्सीच्या मध्यभागी मेट्रो लाईन्सची (Delhi Metro Lines) डिझाईन बनवण्यात आली आहे. जर्सीवर दिल्ली मेट्रो लाईनचा नकाशा दर्शवण्यात आलाय.
ऋषभ पंतचं पुनरागमन
आपीएलआधी दिल्ली कॅपिटल्ससाठी दिलासादायक बातमी समोर आलीय. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचं तब्बल 14 महिन्यांनंतर पुनरामन झालं आहे. बीसीसीआयने पंतच्या खेळण्याला ग्रीन सिग्नल दिलाय. विशेष म्हणजे पंत फलंदाजीबरोबरच विकेटकिपिंगही करणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. यातून ऋषभ पंत आता पूर्णपण सावरला आहे. दिल्लीच्या संघात डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, कुलदीप यादव, मुकेश कुमार असे दमदार खेळाडू आहेत.
@DelhiCapitals
— PUMA Cricket (@pumacricket) March 16, 2024
The all-new PUMA x DELHI CAPITALS men’s jersey weaves together Delhi’s heritage and innovation through its two lifelines — the historic city map and iconic metro line. Grab yours from https://t.co/mvlL4qm392. #PUMAxDC pic.twitter.com/uwhJqDU5R7
दिल्ली संघाला धक्का
ऋषभ पंतचं दिल्ली संघात पुनरागमन झालं असलं तरी एक महत्त्वाचा खेळाडू दिल्ली संघातून बाहेर झाला आहे. चार कोटी रुपयांना विकत घेतलेला हॅरी ब्रूक यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. हॅरी ब्रूकने वैयक्तिक कारणाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यातच दिल्ली संघाचं होम ग्राऊंडही बदलण्यात आलंय. लोकसभा निवडणुकांमुळे दिल्ली कॅपटल्सचे सुरुवातीचे सामने दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवण्यात येणार नाहीत. त्याऐवजी विशाखापट्टणमहे दिल्लीचं होम ग्राऊंड असणार आहे.
दिल्ली संघाचे सामने
दिल्ली कॅपिटल्सच्या मिशन आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात होतेय. पंजाब किंग्सविरुद्ध दिल्लीचा पहिला सामना रंगणार आहे. त्यानंतर 28 मार्चला दिल्लीची राजस्थान रॉयल्सविरुद्ध गाठ पडणार आहे. तर 31 मार्चला दिल्लीचा संघ चेन्नईशी दोन हात करेल. पहिल्या टप्प्यातील दिल्लीचा चौथा सामना 3 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रंगेल.
आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ
ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार.