Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'RCB अजूनही...', Playoffs च्या पहिल्या मॅचआधीच प्रचंड संतापला AB de Villiers; कारण...

IPL 2025 RCB AB de Villiers Angry: अनेक पर्वांमध्ये आरसीबीच्या संघाकडून खेळलेला दक्षिण आफ्रिकेचा हा माजी क्रिकेटपटू चांगलाच संतापला

'RCB अजूनही...', Playoffs च्या पहिल्या मॅचआधीच प्रचंड संतापला AB de Villiers; कारण...

IPL 2025 RCB AB de Villiers Angry: दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ए.बी. डिव्हेलिअर्स इंडियन प्रिमिअर लीगसाठी कॉमेंट्री करणाऱ्यांवर संतापला आहे. आयपीएलमधील कॉमेंटेटर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा अपमान केला जात असल्याचं डिव्हेलिअर्सने म्हटलं आहे. लखनऊ सुपरजायट्संविरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजीवर नाकारात्मक प्रितिक्रिया नोंदवणाऱ्यांवर डिव्हिलिअर्स संतापला आहे. 27 मे रोजी श्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये खेळपट्टीचं विश्लेषण करण्याऐवजी कॉमेंट्री बॉक्समधून आरसीबीच्या गोलंदाजीची खिल्ली उडवली जात असल्याचं म्हणत डिव्हेलिअर्स संतापला. आरसीबीच्या गोलंदाजांना तणावपूर्ण स्थितीमध्ये कामगिरी उंचावता येत नाही अशी टीका कॉमेंट्री बॉक्समधून करण्यात आलेली.

227 धावांचा डोंगर

कॉमेंट्री बॉक्समधून सांगितलं जात होतं त्याप्रमाणे जर खेळपट्टी आव्हानात्मक असती तर ऋषभ पंतने 61 बॉलमध्ये 118 धावा केल्या नसल्या, असं डिव्हेलिअर्सने त्याच्या एबीडी 360 या शोमध्ये म्हटलं आहे. आरसीबी आणि लखनऊच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी पहिल्यांदा गोलंदाजी करताना 227 धावा दिल्या. त्यामुळे आरसीबीचा संघ पाहिल्या दोन स्थानांमध्ये पात्र होणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी ही नामुष्की टाळत सहा विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासहीत आरसीबीचा संघ प्लेऑफचा पहिला सामना खेळणार हे निश्चित झालं आहे. मात्र आज होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीचा संघ खेळण्याआधीच डिव्हिलिअर्सच्या वक्तव्याची जोरदार चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळतेय.

सगळ्या हुशार कॉमेंटेटर्सला...

सध्या कर्णधारपद भूषवणाऱ्या जितेश शर्माने फलंदाजीच्या जोरावर सामाना जिंकून दिला तरी गोलंदाज निवडताना काही चुका केल्या. या चुकांचा फायदा घेत मिचेल मार्श आणि ऋषभ पंतने तुफान फटकेबाजी केली. पंतने 8 षटकार आणि 11 चौकार लगावले. मात्र बंगळुरुच्या संघाने 230 धावा करत सामना जिंकला. या सामन्याबद्दल बोलताना डिव्हेलिअर्सने, "मी काल रात्री कॉमेंट्री ऐकत होतो. मात्र खरं सांगितल्यात ती ऐकून मला संताप आला. आम्ही (आरसीबी) गोलंदाजी करताना ते किती नकारात्मक बोलत होते. आरसीबीचे गोलंदाज तणावात आहेत. त्यांना काही जमेल असं वाटत नाही. फॉर्ममध्ये असलेल्या संघाची लय बिघडतेय, असं कॉमेंट्री बॉक्समधून बोललं जात होतं. कदाचित खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल असंही असावं ना? सगळ्या हुशार कॉमेंटेटर्सला असं नाही वाटत का खेळपट्टीच फलंदाजीसाठी उत्तम होती?" असं म्हणत टीका केली आहे.

प्रश्नांचा भडीमार

"आरसीबी किती वाईट गोलंदाजी करत आहे हे सांगताना मला असं वाटलं की कॉमेंट्री करणारे एक भूमिका घेतात आणि त्याला चिटकून राहतात. होय आरसीबीने कधी चषक जिंकला नाही. पण सतत पुन्हा एकदा असं होतं, तसं होतंय बोलत राहणं किती योग्य आहे? मैदानावर काय घडतंय त्याचा विचार न करता गोलंदाज निष्रभ आहेत. त्यांना काहीच जमत नाही असं बोलत राहण्यात काय अर्थ आहे? खेळपट्टी आव्हानात्मक असती तर पंतला 60 बॉलमध्ये 118 धावा करता आल्या असत्या का?" असा सवाल डिव्हेलिअर्सने केला. 

आरसीबी अजूनही स्पर्धा...

"होय कधीतरी वाईट गोलंदाजी होते. मात्र फलंदाजीला पुरक नसलेल्या खेळपट्टीवर 227 धावा झाल्या म्हणजे त्या दिवशी खेळपट्टी फलंदाजांना साथ देत होती असं स्पष्ट होतंय. आरसीबी अजूनही स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत आहे आणि तेच त्यांनी या सामन्यात सिद्ध केलं," असं डिव्हेलिअर्सने आरसीबीने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करत सामना जिंकल्यानंतर म्हटलं.

Read More