Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीचं वेड CSK संघाला महाग पडतंय? अंबाती रायडूने स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाला 'आतल्या आत अनेक खेळाडूंना...'

IPL 2025: चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एखाद्या देवापेक्षा कमी नाही. पण हे वेड आता हाताबाहेर जात आहे.   

धोनीचं वेड CSK संघाला महाग पडतंय? अंबाती रायडूने स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाला 'आतल्या आत अनेक खेळाडूंना...'

IPL 2025: चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एखाद्या देवापेक्षा कमी नाही. आयपीएल सुरु झाल्यापासून महेंद्रसिंग धोनीचं नाव चेन्नई संघाशी जोडलं असून, आता त्याच्याशिवाय संघ नाही अशी स्थिती झाली आहे. मागील हंगामात चेन्नईच्या बाहेर झालेल्या सामन्यांमध्येही जिथे सामना सुरु आह त्या शहराच्या तुलनेच चेन्नईचे चाहते जास्त दिसत होते. एकट्या धोनी फॅक्टरमुळे हे सगळं सुरु आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता फक्त आयपीएलमधूनच त्याला खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांकडे आहे. 

चेन्नईचे चाहते हे आधी धोनीचे पाठीराखे आहेत असं चेन्नईचा माजी फलंदाज अंबाती रायडूने म्हटलं आहे. पण हे विचित्र वेड फ्रँचायजीसाठी चांगलं नाही असंही स्पष्ट मत त्याने मांडलं आहे. 

"हे खूपच विचित्र आहे आणि मला वाटत नाही की ते प्रत्यक्षात खेळासाठी चांगलं ठरत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर ते खूपच कठीण आहे. ते खूप भडक आहे. त्याला मिळणारा पाठिंबा अद्भुत आहे. पण, जसजसे तुम्ही पुढे खेळता तसतसे तुम्हाला जाणवते की ते चेन्नईचे चाहते होण्यापूर्वी एमएस धोनीचे चाहते आहेत. हे अगदी स्पष्ट आहे आणि योग्य आहे, कारण गेल्या काही वर्षांत संघाची स्थापना आणि बांधणी अशाच पद्धतीने झाली आहे," असं रायडूने रायुडूने ESPNCricinfo ला सांगितलं.

"त्याला देण्यात आलेलं थाला हे नाव अगदी योग्य आहे. तो सीएसकेमध्ये योग्य भूमिका बजावत आहे आणि आता अशा टप्प्यावर आला आहे जिथे लोक सीएसकेसाठी त्याने जे केले आहे त्यामुळे आश्चर्यचकित आणि वेडे झाले आहेत,"  असं तो पुढे म्हणाला.

धोनीला फलंदाजी करताना पाहायला मिळेल यामुळे चेन्नईचे चाहते अनेकदा आपले खेळाडू बाद झाल्यानंतरही आनंद साजरा करतात असं रायडूने सांगितलं. गेल्या आठवड्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचे चाहते त्यांच्याच खेळाडूंना बाद होता पाहून जल्लोष करत होते. चेन्नई सुपरकिंग्जचा माजी खेळाडू असलेल्या रायुडूने खुलासा केला की, भूतकाळातील काही खेळाडूंना चाहत्यांचं हे वर्तन विचित्र वाटलं.

"गेल्या काही वर्षांपासून हे घडत आहे. गेल्या काही वर्षांत बऱ्याच खेळाडूंनी ते अनुभवलं आहे. जर तुम्हाला तसं वाटत नसेल तर बाहेर आणि उघडपणे यावर बोला. पण अंतर्गतदृष्ट्या, अनेकांना गर्दीबद्दल हे वाटत आहे. आम्हालाही धोनी आवडतो आणि त्यांनाही धोनी आवडतो आणि आम्हाला त्याला फलंदाजी करताना पहायचं आहे. परंतु कधीकधी जेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून फलंदाजीसाठी जाता तेव्हा ते गर्दीतून ओरडत असतात... अक्षरशः तुम्हाला आऊट होण्यास सांगत असतात. किंवा ते तुम्ही बाद होण्याची अपेक्षा करत असतात," असं रायडू म्हणाला.

फक्त धोनीच ही समस्या सोडवू शकतो असं रायडू म्हणाला आहे. तसंच पाच वेळा आयपीएल जिंकणारा कर्णधार जेव्हा आजुबाजूला नसेल नाही तेव्हा फ्रँचायझीने त्या वेळेसाठी तयार राहावं असा सल्लाही त्याने दिला आहे. 

"या समस्येवर फक्त धोनीच तोडगा काढू शकतो. जर त्याने बाहेर येऊन सांगितलं की, 'ते सर्व आमचे खेळाडू आहेत, आणि जसा मी फलंदाजी करतो तसेच ते मधल्या फळीत फलंदाजी करत आहेत', किंवा प्रेक्षकांना शांत करणारं जे काही असेल, तर ते खेळाडूंसाठी खूप चांगले होईल," असंही तो म्हणाला. 

"हे खूपच आव्हानात्मक असेल. केवळ खेळाडूंसाठी किंवा चेन्नईसाठीच नाही, तर निश्चितच फ्रँचायझीसाठीही हे आव्हानात्मक आहे. कारण त्यांच्यासाठी अशा प्रकारे गर्दी आकर्षित करणे, विशेषतः वीकडेजलाही स्टँड भरलेले असतात, गर्दी आश्चर्यकारक असते; खरे सांगायचे तर, धोनीच्या आसपास जाणारा कोणताही क्रिकेटपटू नाही. त्यांनी फ्रँचायझीमध्ये गर्दी खेचू शकेल असा दुसरा कोणताही खेळाडू तयार केलेला नाही, कारण ते नेहमीच एमएस धोनीच्या भोवती फिरत राहिले आहे. ब्रँडिंग किंवा गर्दी वाढवण्याच्या बाबतीत ते त्यांना त्रासदायक देऊ शकते. म्हणून काहीतरी घडवण्यासाठी त्यांना खरोखरच चौकटीबाहेर विचार करावा लागेल," असं तो म्हणाला आहे. 

Read More