IPL 2025 : जगप्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा सीजन अगदी धमाकेदार पद्धतीने सुरु आहे. आतापर्यंत स्पर्धेचे एकूण 31 सामने झाले असून प्रत्येक सामन्यानुसार खेळाचा रोमांच वाढू लागलाय. असं असताना या स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत आहे. बीसीसीआयचे अँटी करप्शन आणि सिक्युरिटी युनिट लीगने स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 संघांना याआधीच सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यांना इशारा देण्यात आला आहे की कोणीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्यास लगेचच रिपोर्ट करा. ACSU च्या माहितीनुसार सध्या स्पर्धेवर भ्रष्टाचाराचे संकट घोंगावत आहे. फॅन्स असल्याचे भासवून खेळाडूंना प्रशिक्षकांना, सपोर्ट स्टाफ, संघ मालक तसेच समालोचकांच्या कुटुंबाला महागड्या गोष्टी भेट देऊन आकर्षित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
क्रिकबजने याबाबत एक रिपोर्ट दिला असून त्यात सांगितल्यानुसार, 'ACSU चं म्हणणं आहे की हैदराबादचा एक बिसनेसमॅन स्पर्धेत भाग घेतलेल्या लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय. हा बिझनेसमॅन नक्की कोण आहे याबाबत अजून कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. पण हे नक्कीच कळालं आहे की या बिझनेसमॅनचा सट्टेबाजांशी थेट लागेबांधे आहेत.
हा बिझनेसमॅन यापूर्वी देखील काही काही भ्रष्ट कारवायांमध्ये सहभागी झालेला होता. म्हणूनच ACSU ने आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना याबाबत स्वागत केले आहे. जर या बिझनेसमॅनने कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ताबडतोब तक्रार करा, असेही सांगण्यात आले आहे. तसेच त्याच्याशी असलेले कोणतेही संभाव्य नाते किंवा संलग्नता असल्यास त्याचा खुलासा करावा.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार या व्यक्ती फॅन बनून खेळाडू, कोच, सपोर्ट स्टाफ, टीम मालक इत्यादींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हटलं जातंय की या व्यक्तीला टीमच्या हॉटेल आणि सामन्यादरम्यान सुद्धा पाहण्यात आलंय. तो त्याच्या टार्गेटला प्रायव्हेट पार्टींमध्ये आमंत्रित करतोय. तो केवळ टीममधील सदस्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही भेटवस्तू देत असल्याची माहिती आहे.
सादर बिझनेसमॅन फॅन बनून खेळाडू, कोच तसेच कॉमेंटेटर्सना दागिन्यांच्या दुकानांमध्ये, महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची ऑफर देतोय. एवढंच नाही तर तो सोशल मीडिया द्वारे विदेशी राहणाऱ्या खेळाडूंच्या कुटुंबाला सुद्धा संपर्क करण्याचा त्याने प्रयत्न केलाय.