Mumbai Indians Jasprit Bumrah Injury Updates IPL 2025: मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत तीनपैकी दोन सामन्यात पराभव झाला असून एका सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. केकेआर विरुद्ध सोमवारी वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना मुंबईने जिंकला. मात्र मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अद्याप संघात परतलेला नाही. बुमराह दुखापतग्रस्त असून त्याच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
वर्षाच्या सुरुवातीला खेळवण्यात आलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सामन्यादरम्यान स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीच्या कारणामुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुद्धा मुकला होता. मुंबई इंडियासने आयपीएल 2025 साठी बुमराहला मेगा ऑक्शनपूर्वी 18 कोटींना रिटेन केले होते. बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा खेळाडू आहे. बुमराह सध्या बंगळुरू येथील भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) च्या सेंटर ऑफ एक्सीलेंस, ज्यास आधी नॅशनल क्रिकेट अकॅडमी म्हटले जायचे तिथे उपचार घेत आहे. तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे जसप्रीत बुमराहने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करण्यास सुरुवात केली त्याचा व्हिडीओ सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर बुमराह एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या सामान्यांपासून आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करेल अशी माहिती मिळाली होती. मात्र बुमराहचं हे पुनरागमन आता लांबण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IPL 2025 दरम्यान सारा तेंडुलकर बनली मुंबई संघाची मालकीण, सचिनच्या लेकीचं क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल
आयपीएल 2025 मध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचं आयपीएलमधील पुनरागमन लांबण्याची शक्यता आहे. यापूर्वी बुमराह केवळ मार्चमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये अनुपस्थितीत राहील अशी माहिती होती, तर तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मुंबई संघासोबत जोडला जाईल अशी शक्यता होती. मात्र आता बुमराहच्या पुनरागमनासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार अजून कमीत कमी एक आठवडा तरी बुमराह आयपीएल कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकत नाही. बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे आणि फिटनेसवर काम करत आहे. बुमराह क्लीनिकली फिट आहे. पण वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन त्याला आताच मैदानात उतरण्याची परवानगी देता येणार नाही. रिपोर्टनुसार, बीसीसीआयची वैद्यकीय टीम बुमराहला आणखी वेळ देऊ इच्छित आहे. यामागे बुमराहला पुन्हा दुखापत होण्याचा धोका कमी असावा, अशी त्यांची इच्छा आहे.