Chetan Sakariya: आयपीएल 2025 चा 44 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जातोय. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने त्यांच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले. त्यांनी अशा भारतीय वेगवान गोलंदाजाला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले. जो 2 वर्षांनी आयपीएल सामना खेळण्यासाठी आला होता. हा गोलंदाज शेवटचा 2023 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. विशेष म्हणजे केकेआरने चालू हंगामात या गोलंदाजाला बदली खेळाडू म्हणून समाविष्ट केले. कोणीही मेगा लिलावात त्याला घेण्यात रस दाखवला नाही.
टीम इंडियाचा हा बॉलर 2 वर्षांनी आयपीएल सामना खेळण्यासाठी आलाय. आपण डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाबद्दल बोलतोय. 27 वर्षीय साकारिया शेवटचा 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना दिसला होता. चेतनने भारतीय क्रिकेट संघात टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलंय. 2021 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. असे असले तरी त्याने दोन्ही फॉर्मेटमध्ये फक्त 3 सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये दोन आणि एकदिवसीय सामन्यात एक. या सामन्यांमध्ये त्याच्याकडे एकूण 3 विकेट्स आहेत.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने चेतन साकारियाला घेण्यात रस दाखवला नाही. तो विकला गेला नाही. अस असताना स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक दुखापतग्रस्त असल्याने स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर केकेआरने सकारियाला बदली खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केले. या गोलंदाजाचा 75 लाख रुपयांत केकेआर टीममध्ये समावेश करण्यात आला. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील या टीमने त्याला प्लेइंग-11 मध्येही स्थान दिले आहे. या सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये रमणदीप सिंगच्या जागी चेतनला स्थान मिळाले.
चेतन सकारियाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएल पदार्पण केले. 2021 मध्ये या वेगवान गोलंदाजाने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच 3 विकेट्स घेऊन प्रसिद्धी मिळवली. या पदार्पणाच्या हंगामातच चेतन सकारिया एक मोठा स्टार म्हणून उदयास आला. त्याने राजस्थान रॉयल्सकडून 19 बळी टीपले. त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली. राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त चेतन दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे.
या सामन्यापूर्वी चेतन सकारियाने 19 आयपीएल सामन्यांमध्ये 20 बळी घेतले आहेत. या दरम्यान, चेतन सकारियाची इकॉनॉमी 8.44 आणि सरासरी 29.55 आहे. त्याचा सर्वोत्तम गोलंदाजी आकडा 31 धावांमध्ये 3 विकेट्स आहे. आयपीएलमधील दमदार पदार्पणानंतर चेतन हा टीम इंडियाचा भविष्यातील स्टार असल्याचा दावा केला जात होता. पण त्यानंतर त्याचा खराब फॉर्म दिसून आला. आता चेतन सकारियाला केकेआरने प्लेइंग-11 मध्ये संधी दिलीय. त्यामुळे या सामन्यात चमकदार कामगिरी करण्यासोबतच चेतन केकेआरसाठी आगामी सर्व सामने खेळण्याचा प्रयत्न करेल.