IPL 2025 CSK Dhoni MI Captain Suraykumar Yadav: भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर दिसून आला तो इंडियन प्रिमिअरच्या 18 व्या पर्वात रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात! या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या ओव्हरपासूनच हा निर्णय कसा योग्य आहे याची झलक दिसू लागली. पहिल्याच ओव्हरमध्ये भोपळाही न फोडता रोहित शर्मा तंबूत परतल्यानंतर वेळोवेळी मुंबईचे फलंदाज तंबूत परतत राहिल्याने त्यांना कशीबशी 150 ची धावसंख्या ओलांडता आली. दरम्यान एकीकडे मुंबईची पडझड सुरु असताना दुसरीकडे चेन्नईचा संघ घरच्या मैदानावर चांगलाच फॉर्मात दिसला. या सामन्यातील अनेक क्षण निर्णायक ठरले. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे मुंबईचा हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादवची विकेट. ही विकेट महेंद्र सिंग धोनीच्या चपळाईमुळे मिळाली.
झालं असं की सामन्यातील 11 व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव फलंदाजी करत होता. 29 धावा करुन सूर्यकुमार चांगला सेट झाला होता. तो आता मोठी खेळी करणार आणि मुंबई मोठी धावसंख्या उभारणार असं मुंबईच्या चाहत्यांना वाटत होतं. मात्र नूर अहमदने टाकलेला गुगली सूर्यकुमारला कळलाच नाही. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळला आणि सूर्यकुमारची बॅट चुकवत थेट धोनीच्या ग्लव्हजमध्ये जाऊन विसावला. मात्र हा चेंडू खेळण्यासाठी सूर्यकुमार क्रिज सोडून बराच पुढे आला होता. =
आता धोनी स्टम्पमागे असताना अशी हिंमत करुन पुढे येण्याची किंमत सूर्याला विकेट गमावून मोजावी लागली. चेंडू हातात विसावल्यानंतर धोनीने क्षणाचाही विलंब न लावता बेल्स उडवल्या. ड्राइव्ह मारण्यासाठी सूर्यकुमार पुढे आला अन् नूर अहमद व धोनीच्या जाळ्यात सापडला. सूर्याबरोबर 'नजर हटी दुर्घटना घटी'सारखा प्रकार घडल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> IPL 2025: 'मुंबईचा पहिला सामना देवाला यंदाही ट्रॉफी जिंकणार?' सूर्यकुमार प्रश्न ऐकून हसत म्हणाला, 'ही स्पर्धा...'
धोनी हा 43 वर्षांचा असून त्याची ही आयपीएलमधील 43 वी स्टम्पिंग ठरली. धोनीचं स्टम्प मागील कौशल्य थोडंही कमी झालेलं नाही हे पाहून चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. सध्या धोनीने सूर्यकुमारला तंबूत पाठवताना केलेली ही कामगिरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ...
Watch #CSK legend's jaw-dropping reflexes behind the stumps
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
Updates https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/S26cUYzRd8
चेन्नस्वामी स्टेडियमवर चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भोपळाही न फोडता सामन्याच्या चौथ्या चेंडूवर रोहित तंबूत परतला. तिसऱ्या ओव्हरला रेकेल्टन बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने मुंबईच्या विकेट्स पडत राहिला आणि मुंबईचा संघ कसाबसा 150 च्या पुढे पोहोचला. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 156 धावांचा पाठलाग करताना पाच चेंडू शिल्लक असतानाच सहा विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य काढलं. रचिन रविंद्रने षटकार लगावत चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईचा हा आयपीएलमधील मुंबईविरुद्धचा सलग चौथा विजय ठरला.