Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'250 धावा केल्या म्हणजे...'; IPL 2025 च्या सुरुवातीलाच धोनी जरा जास्तच थेट बोलला, पाहून सारेच अवाक्

IPL 2025 MS Dhoni on Impact Player Rule: 'कॅप्टन कूल'ची प्रतिमा राहिली बाजूला... धोनी यावेळी जरा जास्तच स्पष्ट बोलला आणि IPL 2025 च्या नियमांवरच टाकला कटाक्ष...   

'250 धावा केल्या म्हणजे...'; IPL 2025 च्या सुरुवातीलाच धोनी जरा जास्तच थेट बोलला, पाहून सारेच अवाक्

IPL 2025 MS Dhoni on Impact Player Rule: आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु झाला असून, प्रत्येक संघातील खेळाडू आपआपल्या परिनं या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची छाप पाडताना दिसत आहे. नवख्या खेळाडूंपासून या खेळात मुरलेल्या काही चेहऱ्यांपर्यंत प्रत्येकजण IPL मध्ये आपलं वेगळेपण दाखवत आहे. त्यातच आता MS Dhoni नं त्याच्या एका ठाम आणि तितक्याच स्पष्ट भूमिकेनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा माजी कर्णधार आणि आताच्या घडीला संघातील अनुभवी खेळाडू म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या माहीनं नुकत्याच मांडलेल्या भूमिकेनुसार 2023 च्या आयपीएल हंगामाआधी ज्यावेळी इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player) हा नियम लागू करण्यात आला तेव्हा आपण या नियमाचं फारसं समर्थन केलं नाही, किंबहुना आपल्याला तो नियम पटला नाही, असं त्यानं स्पष्ट केलं. 

250 धावा केल्या म्हणजे...

इम्पॅक्ट प्लेअर हा नियम आला तेव्हापासूनच या नियमासंदर्भात अनेकांचं दुमत पाहायला मिळालं आणि माहीनंसुद्धा या '250 धावा केल्या म्हणजे हा नियमच त्यामागचं कारण नाही' असं स्पष्ट केलं. या नियमामविषयी बोलताना धोनी म्हणाला, 'जेव्हा हा नियम लागू करण्यात आला तेव्हा प्रत्यक्षात या नियमाची गरज नाही असंच मला वाटत होतं. एकिकडून यामुळं माझी मदत होतेही आणि नाहीसुद्धा होत. मी आताही विकेटकिपिंग करतो यासाठीच मी इम्पॅक्ट प्लेअर नाही. मला खेळात तग धरून राहावच लागतं.'

इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळं IPL मध्ये नियमित स्वरुपात 250 किंवा त्याहून अधिक धावसंख्या पाहायला मिळू लागली आहे असं अनेकांच मत असून आपल्याला ही बाब पटत नसल्याचं धोनीनं स्पष्ट केलं. मोठी धावसंख्या ही ठराविक परिस्थितीमुळं उभी राहत असून खेळाडूंच्या सहज होणाऱ्या खेळामुळंही शक्य होत आहे. मोठी धावसंख्या फक्त त्या जास्तीच्या फलंदाजामुळं होत नाहीत, असं स्पष्ट मत त्यानं मांडलं. 

हेसुद्धा वाचा : IPL 2025: 'अर्जुन तेंडुलकरला तुम्ही वाया घालवत आहात'; योगराज सिंग स्पष्टच बोलले, 'कुठे त्याला बॉलिंग...'

 

मुळातच हा दृष्टीकोन असून, आता संघांकडे एका जास्तीच्या फलंदाजाची सहज उपलब्धता असून त्यामुळं ते अधिक आक्रमकपणे खेळतात. इथं सर्वच फलंदाजांना खेळवणं महत्त्वाचं नसून, त्यांच्या असण्यामुळं निर्माण होणारा आत्मविश्वासही इथं महत्त्वाची भूमिका बजावतो आणि टी20 क्रिकेट असंच बदलत चाललं आहे, असं महेंद्रसिंह धोनीनं जिओस्टारशी बोलताना स्पष्ट केलं. 

Read More