IPL 2025 : आयपीएल 2025 चा 67 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातवर 83 धावांनी विजय मिळवला. यासह आयपीएल 2025 मधील चेन्नईने त्यांचा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला तर यासह गुजरातला टॉपवर जाण्यापासून सुद्धा रोखलं.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोघांनी लीग स्टेजमधील त्यांचा शेवटचा सामना खेळला. या सामन्याचा टॉस चेन्नईने जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी 5 विकेट गमावून 230 धावा केल्या. यावेळी आयुष म्हात्रेने 34, डेवोन कॉनवेने 52, उर्वील पटेलने 37, शिवम दुबेने 17, ब्रेव्हिसने 57, रवींद्र जडेजाने 21 धावा केल्या. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 231 धावांचे आव्हान दिलं होतं.
गुजरात टायटन्सकडून हे आव्हान पूर्ण करण्यासाठी शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांची जोडी आली. परंतु यात गिल केवळ 13 धावांवर बाद झाला. तर गुजरातच्या इतर फलंदाजांमध्ये सर्वाधिक धाव संख्या साई सुदर्शन (41) याने केली. अर्शद खान, राहुल तेवतीया, शाहरुख खान आणि रशीद खान हे वगळता उर्वरित इतर कोणताही फलंदाज गुजरातसाठी दोन अंकी धावसंख्या करू शकला नाही. तर चेन्नईच्या गोलंदाजांपैकी अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर रवींद्र जडेजाने 2 आणि खलील अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हेही वाचा : रविवारी IPL मध्ये शेवटचा सामना खेळणार MS Dhoni? गुजरात विरुद्ध टॉस जिंकल्यावर नेमकं काय म्हणाला?
आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (कर्णधार), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद
शुभमन गिल (कर्णधार ), जोस बटलर (विकेटकिपर ), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, जेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा