IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये शनिवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK VS RCB) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने चेन्नईवर 2 धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या 18 व्या सीजनमधील 8 वा विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. चेन्नईची फलंदाजी सुरु असताना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानात अंपायरशी वाद घालायला लागला. DRS वरून अंपायर आणि जडेजामध्ये वाद झाला, या घटनेवरून चेन्नई सुपरकिंग्सचे फॅन्स अंपायर आणि आरसीबीला ट्रोल करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपरकिंग्सची फलंदाजीची इनिंग सुरु असताना 17 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. मैदानातील अंपायरने चेन्नई सुपरकिंग्सला DRS देण्यास नकार दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध या अत्यंत दबावपूर्ण सामन्यात चेन्नईला डेवाल्ड ब्रेविसचं आउट होणं खूप महागात पडलं. 17 व्या ओव्हरचा तिसरा बॉल फलंदाज डेवाल्ड ब्रेविसच्या पॅडवर जाऊन लागला. ज्यावर ऑन फील्ड अंपायर नितिन मेननने त्याला LBW आउट दिले.
डेवाल्ड ब्रेविसला मैदानातील अंपायरने LBW आउट करार दिल्यावर या निर्णयाविरोधात रवींद्र जडेजाने डिसीजन रिव्यू सिस्टम (DRS) घेण्याचा इशारा केला. परंतु अंपायर नितिन मेननने चेन्नईला DRS घेण्यास नकार दिला. अंपायर नितीन मेनन यांचं म्हणणं होतं की, DRS घेण्यासाठी दिला जाणारा 15 सेकंदांचा वेळ संपला आहे. यावरून जडेजाने अंपायरशी वाद घातला परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर डेवाल्ड ब्रेविसला डक आउट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं.
हेही वाचा : ड्रग्स टेस्टमध्ये फेल झाला कागिसो रबाडा, IPL 2025 दरम्यान लागला बॅन, स्वतः केला खुलासा
Time's up
Star Sports (StarSportsIndia) May 3, 2025
Dropped catches, scintillating boundaries, back-to-back wickets & endless drama ViratKohli vs MSDhoni one last time Is living up to the expectations Who's winning it from here?
Watch the LIVE action https://t.co/dl97nUfgCR IPLonJioStar pic.twitter.com/0uSxPYEoWL
No timer to let the batsmen know
— Rekha (@sameera2802) May 3, 2025
Wickets missing visible in naked eyes
Nitin Menon as umpire
Won by fixing RCBTweets pic.twitter.com/jq8saMsHdI
सदर घटनेदरम्यान हैराण करणारी गोष्टी ही की नेहमी DRS चा टाइम मोठ्या स्क्रीनवर येतो, परंतु यावेळी तसं झालं नाही. डेवाल्ड ब्रेविसला माहिती पडलं नाही की DRS घेण्यासाठी त्याच्याकडे किती वेळ आहे. शिवाय मैदानातील अंपायरने LBW आउट दिल्यावर सुद्धा डेवाल्ड ब्रेविसने रवींद्र जडेजा सोबत एक धाव घेतली, ज्यामध्ये 15 सेकंद वाया गेले. पण चेन्नईच्या खात्यात ही धाव मोजली गेली नाही कारण LBW आउट दिल्यावर तो बॉल डेड समजण्यात आला. डेवाल्ड ब्रेविसने जर DRS घेतली असती तर तो वाचला असता, कारण बॉल ट्रॅकिंगवरून स्पष्ट दिसत होतं की तो बॉल लेग स्टंपला मिस करत होता. डेवाल्ड ब्रेविसला DRS घेण्यास नकार देण्यात आला तेव्हा रवींद्र जडेजा हा मैदानातील अंपायर नितीन मेनन यांच्याशी वाद घालू लागला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चिन्नस्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी 214 धावांचे आव्हान दिले होते. परंतु ते हे आव्हान पूर्ण करू शकले नाहीत आणि 2 धावांनी चेन्नईचा पराभव झाला.