Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनी सोबत फोटोत दिसणारा 'हा' चिमुकला, आज CSK विरुद्ध उतरणार IPL 2025 च्या मैदानात

IPL 2025 : राजस्थान रॉयल्स संघाला अद्याप त्यांच्या विजयाचं खात उघडायचंय. तेव्हा चेन्नई आणि राजस्थानपैकी कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. असं असतानाच धोनी सोबत एका चिमुकल्या मुलाचा फोटो सध्या व्हायरल होतोय.

धोनी सोबत फोटोत दिसणारा 'हा' चिमुकला, आज CSK विरुद्ध उतरणार IPL 2025 च्या मैदानात

IPL 2025 : आयपीएल 2025 (IPL2025) मधील 11 वा सामना हा रविवार 30 मार्च रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Chennai Superkings) यांच्यात खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलच्या नव्या सीजनमध्ये 2 सामने खेळले असून यापैकी एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला. तर राजस्थान रॉयल्स संघाला अद्याप त्यांच्या विजयाचं खात उघडायचंय. तेव्हा चेन्नई आणि राजस्थानपैकी कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. असं असतानाच धोनी सोबत एका चिमुकल्या मुलाचा फोटो सध्या व्हायरल होतोय. हा चिमुकला आता मोठा झाला असून आज होणाऱ्या सामन्यात सीएसके आणि धोनी विरुद्ध खेळताना दिसणार आहे. 

गुवाहाटी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवारी संध्याकाळी 7: 30  वाजता सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये एक चिमुकला धोनी सोबत फोटोमध्ये दिसत आहे. हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून राजस्थान रॉयल्सचा स्टार ऑल राउंडर रियान पराग आहे. लहान असताना रियान परागने त्याचा आवडता क्रिकेटर एम एस धोनी सोबत फोटो काढला होता. आता वयाच्या 23 व्या वर्षी रियान पराग आयपीएलमध्ये धोनी विरुद्ध खेळणार आहे. राजस्थानने एक व्हिडीओ शेअर करून याला 'आदर्शापासून ते प्रतिस्पर्ध्यांपर्यंत, नियतीचा खेळ!' असं कॅप्शन दिलंय. 

पाहा व्हिडीओ : 

रियान परागचं करिअर : 

रियान परागने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वनडे आणि टी 20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं आहे. रियानने वनडेमध्ये एक सामना खेळला असून यात 15 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी २० मध्ये त्याने  9 सामन्यात 106 धावा आणि 4 विकेट घेतल्या आहेत. रियान परागने २०१९ च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच पदार्पण केलं होतं. रियानने आतापर्यंत आयपीएलमध्ये 71 सामने खेळले असून यात त्याने 1202 धावा आणि 4 विकेट घेतल्या आहेत. 

रियान पराग समोर नतमस्तक झाला चाहता : 

गुवाहाटी स्टेडियमवर आयपीएल 2025 मध्ये केकेआर विरुद्ध राजस्थान सामन्यात एक व्यक्ती मैदानातील सुरक्षा भेदून मैदानात घुसला. हे तेव्हा घडलं जेव्हा सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा संघ फिल्डिंग करत होता. राजस्थानचा खेळाडू रियान पराग गोलंदाजी करत होता, रियान चौथी ओव्हर टाकणार तेवढ्यात एक व्यक्ती धावत त्याच्या जवळ गेला. मैदानात धावत येणाऱ्या व्यक्तीला पाहून फलंदाजाने रियानला थांबण्यास सांगितले. मैदानात घुसलेला व्यक्ती रियानला भेटला आणि थेट त्याच्या पायावर नतमस्तक झाला. हे पाहून सर्वच हैराण झाले. नंतर सुरक्षारक्षकांनी व्यक्तीला पकडले आणि मैदानाबाहेर नेले. याचा अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

Read More