Operation Sindoor : 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. मात्र या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्धजन्य परिस्थती निर्माण झाली असून 8 मे रोजी सायंकाळपासून पाकिस्तानकडून भारताच्या विविध भागांमध्ये हल्ले करण्यात येत आहेत. आयपीएल 2025 मध्ये आज 58 वा सामना हा धर्मशाला स्टेडियमवर (Dharmshala Stadium) खेळवण्यात येत होता. मात्र पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मशाला येथील HPCA मैदानावर ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे.
IPL Chairman requesting fans to leave the Dharamshala Stadium. pic.twitter.com/NhX03h0Ys3
Mufaddal Vohra (mufaddalvohra) May 8, 2025
8 मे रोजी धर्मशाला स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवला जात होता. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून फलंदाजीला निवडली. पंजाब किंग्सने फलंदाजी करत असताना 1 विकेट गमावून 122 धावा केल्या. मात्र 10.1 ओव्हर सुरु असताना पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मशाला स्टेडियमवर ब्लॅकआऊट करण्यात आलं, फ्लडलाइट्स बंद करण्यात आल्या. त्यानंतर आयपीएलकडून पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांना सुखरूप स्टेडियम बाहेर काढले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सामना रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.
पंजाब किंग्स विरुद्व दिल्ली कॅपिटल्स सामना हा सुरुवातीला पावसाच्या अडथळ्यामुळे उशिरा सुरु झाला होता. पंजाब किंग्सकडून फलंदाजी करत असताना प्रियांश आर्याने 70 धावा केल्या. प्रभसिमरन सिंहने नाबाद 50 धावा केल्या. पंजाब किंग्सने 122 धावा केल्या होत्या.