IPL 2025 : 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या 'ऑपरेशन सिंदूर' ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं. यानंतर सुरक्षेच्या कारणास्थव भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील जवळपास 18 एअरपोर्ट बंद करण्यात आले आहेत. ज्यात श्रीनगर, जेह, जम्मू, मृतसर, पठानकोट, चंडीगढ़, जोधपुर, जैसलमेर, शिमला, धर्मशाला आणि जामनगर इत्यादी एअरपोर्टचा समावेश आहे.
भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हमला केल्यावर सुरक्षेच्या कारणामुळे धर्मशाला येथील एअरपोर्ट तात्पुरत्यावेळेसाठी बंद करण्यात आले आहेत. परंतु यामुळे आयपीएल संघांच्या कार्यक्रमांवर परिणाम झालाय, ज्यांचे सामने हे धर्मशाला स्टेडियमवर होणार होते. धर्मशालामध्ये गुरुवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर 11 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात याच ठिकाणी सामना होईल. मात्र आता मुंबई इंडियन्स विरुद्ध होणारा हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाण्याची शक्यता आहे.
धर्मशाला स्टेडियम हे आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सचं दुसरं होम ग्राउंड आहे. पंजाब किंग्सला सध्या ट्रॅव्हल करण्यासंदर्भात कोणतीही अडचण नाही कारण त्यांचे दोन्ही सामने हे धर्मशाला स्टेडियमवर आहेत. परंतु यात दिल्ली कॅपिटल्सला गुरुवारी पंजाब विरुद्ध सामन्यानंतर त्यांची टीम धर्मशालावरून परत कशी येईल याबाबत विचार करायचा आहे. याच कारण असं की गुरुवारनंतर लगेचच रविवारी गुजरातच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला गुजरात टायटन्स विरुद्ध सामना खेळायचा आहे.
एअरपोर्ट बंद असल्याने मुंबई विरुद्ध पंजाब हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने म्हंटले की, सध्या सर्व काही अनिश्चित आहे. आम्ही संघांशी बोलत आहोत आणि ते सुद्धा विचार करतायत की एअरपोर्ट बंद राहिल्यामुळे धर्मशालावरून दिल्लीचा संघ परत कसा येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सकडे बसने ट्रॅव्हल करण्याचा एक पर्याय आहेच परंतु फक्त संघच नाही तर प्रसारण टीम आणि उपकरण सुद्धा यात सामील आहेत.