Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025: 65 दिवस 74 सामने, ट्रॉफी जिंकण्यासाठी 10 संघ करणार संघर्ष! स्पर्धेची प्रत्येक महत्त्वाची माहिती जाणून घ्या

IPL 2025 Latest News: IPL 2025 चा बिगुल आता काही तासात वाजणार आहे. या 18 व्या आयपीएल हंगामात काय होणार आहे? स्पर्धेशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर जाणून घ्या.  

IPL 2025: 65 दिवस 74 सामने, ट्रॉफी जिंकण्यासाठी 10 संघ करणार संघर्ष! स्पर्धेची प्रत्येक महत्त्वाची माहिती जाणून घ्या

IPL 2025 Full Details: अजून काही तास... आणि IPL 2025 चा थरार सुरु होणार. ची आज (22 मार्च) संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे उद्घाटन समारंभाने IPL 2025 ची रंगतदार सुरुवात होईल. पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. केकेआरने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून विजेतेपद पटकावले. मात्र, यंदा केकेआर संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला स्पर्धेशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊयात.. 

कसा असणार उद्घाटन समारंभ? 

आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे  उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ  22 मार्च रोजी म्हणजेच आजच संध्याकाळी 6 वाजता ईडन गार्डन्सवर होणार आहे. यामध्ये श्रेया घोषाल, दिशा पटानी यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आपला परफॉर्मन्स देणार आहेत. उद्घाटन समारंभ स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर आणि JioHotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे प्रसारित केला जाऊ शकतो.

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडला खजिना, खेळाडूंवर पैशांचा वर्षाव

 

 

65 दिवस 74 सामने, कधी होणार फायनल?

आयपीएल 2025ची सुरुवात 22 मार्चपासून होत आहे. ही स्पर्धा दोन महिन्यांहून अधिक काळ चालणार आहे. 65 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. या हंगामातील प्लेऑफ सामने हैदराबाद आणि कोलकाता येथे रंगणार आहेत. क्वालिफायर-2 आणि अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर, तर क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

हे ही वाचा: IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सने लाँच केले नवीन अँथम सॉंग, 'या' खास व्यक्तीने गायलं आहे गाणं; Video Viral

 

10 संघांमध्ये असणार ट्रॉफी जिंकण्यासाठी लढत 

या स्पर्धेत ऐकवून 10 संघ सहभागी झाले आहेत. यंदा चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ 10 आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करतील. मुंबई आणि चेन्नईच्या संघांची नजर यंदा सहाव्या विजेतेपदाकडे असेल. त्याचबरोबर केकेआर सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद प्रत्येकी एकदा आयपीएल चॅम्पियन बनले आहेत. तर  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स त्यांचे ट्रॉफीचे खाते उघडायची वाट बघत आहेत. 

हे ही वाचा: IPL Umpire Salary: आयपीएलमध्ये पंचांना किती पगार मिळतो? एका सिजनची कमाई ऐकून बसेल धक्का!

रोज सामने किती वाजता सुरू होतील?

या सिजनचे सामने दरवर्षी प्रमाणेच संध्याकाळचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. तर नाणेफेकीची वेळ संध्याकाळी 7 वाजता असेल. त्याचबरोबर डबल हेडरवर होणाऱ्या सामन्यांमध्ये दिवसाच्या सामन्यांची वेळ दुपारी 3.30, नाणेफेकीची वेळ दुपारी ३ वाजता असेल. 

Read More