Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'मुंबई इंडियन्स अन् रोहितला दाखवण्यासाठीच त्याने...'; SRH कडून इशानने शतक झळकावल्यानंतर माजी क्रिकेटरचं विधान

Ishan Kishan Century Celebration: सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून आपला पहिलाच सामना खेळताना इशानने दमदार शकत झळकावलं.

'मुंबई इंडियन्स अन् रोहितला दाखवण्यासाठीच त्याने...'; SRH कडून इशानने शतक झळकावल्यानंतर माजी क्रिकेटरचं विधान

IPL 2025 Ishan Kishan Century Celebration: सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून यंदाचं इंडियन प्रिमिअर लीग खेळणाऱ्या इशान किशनने पहिल्याच समान्यात दमदार शतक झळकावलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना 44 धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये पहिल्यांदाच सनरायझर्सकडून खेळताना इशानने 47 चेंडूंमध्ये नाबाद 106 धावांची खेळी केली. याच खेळीच्या जोरावर सनरायझर्सला मोठी धावसंख्या उभारता आली. सनरायझर्सकडून आयपीएलमध्ये शतक झळकावणारा इशान हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या दमदार शतकानंतर इशानने मैदानभर पळत सेलीब्रेशन केलं. त्याच्या याच सेलिब्रेशनवरुन इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

रोहित आणि मुंबईला दाखवण्यासाठी सेलिब्रेशन

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने इशान किशनने हैदराबादकडून पहिल्यांदाच खेळताना शतक झळकावल्यानंतर केलेलं आक्रमक सेलीब्रेशन हे बरंच काही सांगणारं होतं असं म्हटलं आहे. या आक्रमक सेलिब्रेशनमागे बराच अर्थ दडल्याचं वॉर्नने म्हटलं आहे. "इशानने शतक झळकावल्यानंतर त्याने जे सेलीब्रेशन केलं ते कदाचित मुंबईला दाखवण्यासाठी किंवा निवड समितीच्या अध्यक्षांना दाखवण्यासाठी किंवा रोहित शर्माला उद्देश होऊन. किंवा ते संपूर्ण भारत अथवा क्रिकेट विश्वाला उद्देशून होतं. त्यामधून त्याला हे सांगायचं होतं की, "बघा मी चांगला खेळाडू आहे." तो एक उत्तम संतुलन साधाणारा फलंदाज आहे," असं वॉर्न म्हणाला.

इशानवर कौतुकाचा वर्षाव

इशान किशनवर कौतुकाचा वर्षाव करताना, "तो अगदी जोदार फटक्यांपासून ते मनगटी फटकेही छान मारतो. कोणत्याही अखूड टप्प्याचा चेंडू असेल तर तो ऑन साईडला उत्तम फटकेबाजी करु शकतो. मला भारताच्या निवड समितीचा अध्यक्ष व्हायला आवडेल. निवड समितीची बैठक फार लांबलचक असेल कारण एवढ्या खेळाडूंबद्दल बोलावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला एखाद्या खेळाडूला सांगावं लागेल की, "सॉरी, तू अव्वल पाचमध्येही नाहीस." भारतात फार उत्तम खेळाडू मोठ्या संख्येनं आहेत. ते इथपर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उत्तम  कामगिरी करणे आणि आपली दखल घ्यायला इतरांना भाग पाडणे," असं वॉर्न म्हणाला.

इशानला 11.25 कोटी रुपयांना संघात स्थान

"माझ्यामते क्रिकेटमधील सर्वच फॉरमॅटमध्ये शतक झळकावणं कठीण आहे. मात्र त्यातही टी-20 मध्ये शतक झळकावणं फार कठीण आहे," असं वॉर्नने 'क्रिकबझ'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. सन रायझर्सने इशानला 11.25 कोटी रुपयांना संघात स्थान दिला आहे. इशान जेव्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा हैदराबादचा संघ 3.1 ओव्हरमध्ये 45 धावांवर होता. इथून खेळायला सुरुवात केल्यानंतर इशान अगदी शेवटपर्यंत नाबाद राहिला. हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्यांमध्ये अव्वल पाच पैकी चार धावसंख्या आपल्या नावे केल्या आहेत. इशानने सामन्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने मला खूप स्वातंत्र्य दिलं. त्यासाठी मी त्याचा आभारी आहे, असं म्हटलं.

Read More