Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मैदानात SRK ला पाहताच Security जाळीवर चढला अन्..; IPL मॅचनंतर काय झालं, पाहा Video

Fan Tries To Breach Security To Meet SRK: अभिनेता शाहरुख खानला पाहिल्यानंतर त्याला भेटण्यासाठी हा चाहता समोरच्या जाळीवर चढला.

मैदानात SRK ला पाहताच Security जाळीवर चढला अन्..; IPL मॅचनंतर काय झालं, पाहा Video

Fan Tries To Breach Security To Meet SRK: चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण या तीन गोष्टींमध्ये भारतीयांना विशेष रस असतो असं म्हटलं जातं. त्यातही यापैकी कोणत्याही दोन गोष्टी एकत्र आल्या की भारतीयांच्या उत्साहाला सीमा राहत नाही. असाच काहीसा प्रकार नुकत्याच झालेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यात दिसून आला. कोलकात्यामध्ये झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सामन्यादरम्यान अभिनेता शाहरुख खानच्या एका चाहत्याने मैदानात प्रेक्षकांनी आसनव्यवस्थेची जागा सोडून मैदानात प्रवेश करुन नये म्हणून लावण्यात येणारी सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. मात्र त्यानंतर जो काही गोंधळ झाला तो मात्र चर्चेत आहे.

इंटरनेटवर पडले दोन गट

शनिवारी, 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सच्या मैदानात आयपीएलचा पहिला सामना पार पडला. हा सामना बंगळुरुच्या संघाने सहज जिंकला. मात्र या सामन्यादरम्यान मैदानातील प्रेक्षकांमध्ये झालेल्या गोंधळाचा एक व्हिडीओ जवळपास आठवडाभराने समोर आला आहे. या चाहत्याने मैदानात लावलेली सुरक्षेची जाळी ओलांडण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या राड्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर दोन गट पडल्याचं दिसत आहे.

चूक कोणाची?

या चाहत्याने असं करायला नको होतं, असं म्हणत चाहत्याचीच यात चूक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांनीही अशाप्रकारे चाहत्याला मारहाण न करता जरा धीराने घ्यायची गरज होती, असंही अनेकांनी म्हटलं आहे. अशा लोकांना मारहाण करुन पोलिसांना काय मिळतं? त्यांनी अशा स्थितीत थोडं सुबरीनं घेतलं पाहिजे, असं मत पोलिसांच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांनी नोंदवलं आहे. 

यापेक्षा स्वत:साठी काहीतरी करा

जी व्यक्ती आपल्याला ओळखतही नाही तिच्यासाठी हे अशाप्रकारे वागून चारचौघात स्वत:चा अपमान करुन घेणं किती योग्य आहे? त्याऐवजी अशा लोकांनी स्वत:च्या कुटुंबासाठी आणि स्वत:च्या उद्धारासाठी काहीतरी करायला हवं, असं मत एकाने नोंदवलं आहे.

पोलीस कामाच्या नावाखाली काहीही करतात

अन्य एकाने चाहत्याची चूक आहे हे मान्य केलं तरी अशाप्रकारे त्याला मारहाण करण्याची पोलिसांना गरज नव्हती. चांगल्या भाषेत समज देऊन त्याला सोडता आलं असतं. चाहत्याची चूक आहे तशीच मारहाण करुन जर या मुलाला काही गंभीर दुखापत झाली तर पोलीस त्याला पैसे देणार आहेत का? नोकरीच्या नावाखाली पोलिसवाले काहीही करतात, अशी खोचक टीका केली आहे.

हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

Read More