IPL 2025 New Schedule: 7 मे ते 10 मे दरम्यान झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणाचा आयपीएलवर परिणाम झाला. यामुळे आयपीएल 2025 ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली. आता भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला लष्करी लढत संपल्यानंतर, लीग पुन्हा सुरू करण्याबाबतच्या चर्चेला उधाण आले. आता युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. रिपोर्ट्स नुसार 9 मे रोजी एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली स्पर्धा ही आता गुरुवार (15 मे) किंवा शुक्रवार (16 मे) रोजी पुन्हा सुरू होणार आहे. याशिवाय अंतिम सामना 25 मे रोजी होणार होता, पण आता ही तारीख बदलेल अशी माहिती आहे.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये शनिवारी, 10 मे रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) उर्वरित वेळापत्रक आणि सामन्यांना अंतिम स्वरूप देण्याचे काम करत आहे आणि विश्वसनीय सूत्रांनुसार, धर्मशाला वगळता सर्व सामने भारताच्या वेगवेगळ्या भागात खेळवले जातील."
हे ही वाचा: MS Dhoni भारतीय सैन्यात आहे 'या' पदावर, त्याला किती पगार मिळतो माहितेय? जाणून घ्या
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नवीन वेळापत्रकात अंतिम सामना हा 25 मे ऐवजी 30 मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. याशिवाय .इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 16 मे पासून उर्वरित सामने खेळवण्याचा विचार करत आहेत. उर्वरित सामने चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद या तीन ठिकाणी आयोजित करण्याचा विचार करत आहे. परंतु काही संघांतील परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आता त्याच्या उपलब्धतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या सिजनमध्ये 10 संघांकडून 60 हून अधिक परदेशी खेळाडू खेळत आहेत. आतापर्यंत एकूण 57 सामने खेळले गेले आहेत.
हे ही वाचा: "सिलेक्टर्सनी ऑफर दिली असावी..." वीरेंद्र सहवागने उलगडले रोहित शर्माच्या टेस्ट निवृत्तीमागचे कारण
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांनुसार सध्या टेबल पॉईंट्सवर गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर आरसीबी, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना मधेच रद्द करण्यात आला होता. यानंतर दोन्ही संघांमध्ये कोणतेही गुण वाटप झालेले नाहीत. आधीच्या सामन्यानुसार, दिल्ली 11 सामन्यांनंतर 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. शाहरुख खानचा संघ केकेआर आणि लखनौ सुपर जायंट्स हा संघ अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. राजस्थान आणि सीएसके या टेबलमध्ये एकदमच तळाशी आहेत.