Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'बॉलर्सवर टीका करण्याआधी कॉमेंटेटर्सने स्वत:ची...'; सततच्या टीकेने वैतागलेल्या शार्दुलने सुनावलं

IPL 2025 Shardul Thakur Slams Commentators: शार्दुल ठाकूरने कॉमेंट्री करणाऱ्यांनाच झापल्याचं पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळालं आहे.

'बॉलर्सवर टीका करण्याआधी कॉमेंटेटर्सने स्वत:ची...'; सततच्या टीकेने वैतागलेल्या शार्दुलने सुनावलं

IPL 2025 Shardul Thakur Slams Commentators: लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने समालोचकांना जशास तसं उत्तर दिलं आहे. वारंवार समालोचक शार्दुल ठाकूरवर टीका करत असल्याने अखेर शार्दुलने बदलणाऱ्या क्रिकेटप्रमाणे आपल्या गोलंदाजीत बदल केला नाही अशी टीका करणाऱ्यांना कठोर शब्दांमध्ये सुनावलं आहे. 33 वर्षीय शार्दुलने आयपीएलमध्ये समालोचन करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

शार्दुलवर का होते टीका?

लखनऊच्या संघाने गुजरात टायटन्सविरुद्धचा शनिवारी झालेला सामना जिंकला. या स्पर्धेमध्ये शार्दुलला अगदी शेवटच्या क्षणी लखनऊच्या संघात संधी देण्यात आली. तो या स्पर्धेतील आतापर्यंतचा लखनऊसाठीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 6 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अनेकदा शार्दुलने गरजेपेक्षा अधिक धावा दिल्याची टीका कॉमेंट्री बॉक्समधून होताना पाहायला मिळालं आहे. शार्दुल मोठ्या संख्येनं समोरच्या संघाला धावा देतो अशी टीका अनेक समालोचकांनी आणि क्रिकेट तज्ज्ञांनी केली आहे. या टीकेला शार्दुल ठाकूरने उत्तर देताना, समालोचकांनी त्यांची स्वत:ची आकडेवारी आधी पहावी असा टोला लगावला आहे. 200 हून अधिक धावा केल्या जातात अशा स्पर्धेबद्दल बोलताना आधी स्वत:ची आकडेवारी पाहून समालोचकांनी प्रतिक्रिया द्यावी असं शार्दुल म्हणाला आहे.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता...

"गोलंदाजीसंदर्भात मी कायम एका गोष्टीवर पाहत आलो आहे ती म्हणजे आम्ही संपूर्ण सिझनमध्ये गोलंदाजी करतो. त्यावेळी अनेकदा कॉमेंट्री बॉक्समधून टीका होताना दिसली आहे. कॉमेंट्री बॉक्समधून अनेकदा गोलंदाजांवर कठोर शब्दांमध्ये टीका होते. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता क्रिकेट 200 हून अधिक धावा केल्या जातात अशा दिशेने गेलं आहे. 200 हून अधिक धावा आता सामान्य बाब झाली आहे. टीका कायमच होत राहणार. खास करुन कॉमेंट्री करणारे टीका करणारच," असं शार्दुलने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> RCB च्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं! धाप लागल्याने विराट संजूजवळ जाऊन म्हणाला, 'जरा माझी...'; पाहा Video

स्टुडिओमध्ये बसून...

बॉलर्सवर टीका करण्याआधी कॉमेंटेटर्सने स्वत:ची आकडेवारी एकदा पाहून घ्यावी, असा खोचक सल्ला शार्दुलने दिला आहे. "स्टुडिओमध्ये बसून एखाद्याच्या बॉलिंगवर बोलणं सोपं असतं. मात्र त्यांना मैदानावरील परिस्थितीचा अंदाज नसतो. त्यांनी आधी स्वत:च्या कामगिरीची आकडेवारी पहावी, असं मला वाटतं," असा टोला शार्दुलने पत्रकारांसमोर बोलताना लगावला. शार्दुलने आयपीएलमधील नुकत्याच झालेल्या लखनऊच्या सामन्यात 34 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या.

Read More