Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'धोनीला सांग आता तू...', ऋतुराज गायकवाडला माजी सहकारी खेळाडूचा थेट सल्ला; 'जर तो साध्या 10 ओव्हर्सही...'

IPL 2025: दिल्लीविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) केलेल्या संथ खेळीमुळे पुन्हा एकदा त्याला क्रिकेट चाहते आणि समीक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.   

'धोनीला सांग आता तू...', ऋतुराज गायकवाडला माजी सहकारी खेळाडूचा थेट सल्ला; 'जर तो साध्या 10 ओव्हर्सही...'

IPL 2025: चेन्नई सुपरकिंग्जचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आयपीएल 2023 च्या विजयानंतरच निवृत्ती घ्यायला हवी होती असं स्पष्ट मत भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारीने मांडलं आहे. दिल्लीविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) केलेल्या संथ खेळीनंतर पुन्हा एकदा त्याला क्रिकेट चाहते आणि समीक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज तिवारीने हे विधान केलं आहे. तसंच ऋतुराज गायकवाडला धोनीच्या भविष्याबाबत कठोर निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. 

दिल्लीविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. दिल्लीने दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी नाबाद राहिला. धोनीने 26 चेंडूत फक्त 30 धावा केल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सहाव्या विकेटसाठी धोनीने विजय शंकरसह 84 धावांची भागीदारी केली. पण संथगतीने खेळल्याने चेन्नई 25 धावांनी सामना गमावला. चेन्नईने आपल्या चार सामन्यांपैकी तीन सामने गमावले आहेत. दिल्लीविरोधातील पराभव हा त्यांचा सलग दुसरा ठरला. 

'अरे हा तर फुसका बार निघाला,' धोनीची संथ खेळी पाहून नवज्योत सिंग सिद्धू संतापले, 'आता काय...'

 

Cricbuzz शी संवाद साधताना मनोज तिवारी म्हणाला की, गेल्या दोन वर्षात धोनीचा वारसा नाहीसा होत चालला आहे हे पाहून वाईट वाटत आहे. 2023 च्या विजेतेपदानंतर त्याने त्याची शानदार आयपीएल कारकीर्द संपवायला हवी होती असं मतही त्याने व्यक्त केलं. 

"मी जर जास्तच स्पष्ट बोलत असेन तर मला माफ करा. पण त्याने आयपीएल 2023 नंतर निवृत्ती घ्यायला हवी होती. ती त्याची सर्वोत्तम वेळ होती. त्याने इतक्या वर्षांमध्ये जो काही आदर कमावला आहे, तो पाहता गेल्या 2 वर्षात चाहत्यांना त्याची स्थिती पाहवत नाही. तो सध्या हरवत चालला आहे. चेन्नईचे चाहते कसे व्यक्त होतात ते पाहा. ते रस्त्यावर येऊन कशाप्रकारे मुलाखती देत आहेत ते पाहा," असं मनोज तिवारी म्हणाला. 

'तो 30 ओव्हर फिल्डिंग करु शकतो, पण 10 ओव्हर्स फलंदाजी करु शकत नाही?'

आयपीएलमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणाऱ्या मनोज तिवारीने स्टीफन फ्लेमिंगने धोनीच्या फलंदाजीच्या क्रमांकाबाबत केलेल्या खुलाशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने म्हटलं होतं की, धोनी अजूनही गुडघ्याच्या समस्येशी संघर्ष करत आहे. ज्यासाठी त्याने 2023 मध्ये शस्त्रक्रिया केली होती, त्यामुळे तो 10 षटकांपेक्षा जास्त फलंदाजी करू शकत नाही आणि म्हणूनच, चेन्नईने त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकावर लक्ष केंद्रित केलेलं नाही. धोनी 20 षटकं क्षेत्ररक्षण करु शकतो, मात्र 10 षटकांपेक्षा जास्त फलंदाजी करू शकत नाही हे समजणं कठीण असल्याचं तिवारीने म्हटलं आहे.  म्हणूनच, चेन्नईने मोठा निर्णय घ्यावा आणि धोनीला एक पाऊल मागे हटून खेळातून निवृत्त होण्यास राजी करावे अशी त्याची इच्छा आहे.

"तो प्रयत्न करत आहे. स्टीफन फ्लेमिंगने असंही म्हटले आहे की धोनी 10 षटकांपेक्षा जास्त फलंदाजी करू शकत नाही. पण मला समजत नाही की जेव्हा तुम्ही 20 षटकांपेक्षा जास्त क्षेत्ररक्षण करू शकता, जिथे तुम्हाला वर-खाली बसावे लागते, झेल घेण्यासाठी डाईव्ह करावं लागतं, रनआउट करावं लागतं, तेव्हा तुमच्या गुडघ्याला दुखापत होत नाही, परंतु जेव्हा संघाला जिंकण्यास मदत करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही 10 षटकांबद्दल बोलता. सर्व निर्णय त्याच्याभोवती घेतले जात आहेत, परंतु संघासाठी काहीही फायदा होत नाही. मला वाटतं की त्यांनी कठोर निर्णय घ्यावा आणि त्याला समजावून सांगावे आता हे जमत नाही आहे आणि त्याने निघून जावे," असंही तो म्हणाला.

Read More