IPL 2025 : आयपीएल 2025 मधील बारावा सामना हा सोमवार 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात पार पडणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स यांनी नव्या सीजनमध्ये दोन सामने खेळले असून यापैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. तर मुंबई इंडियन्सला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले असून ते अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारी मुंबईचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर यांच्यात सामना पार पडणार आहे. यापूर्वी झालेला टॉस मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने जिंकला.
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2025 चा 12 वा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचा टॉस मुंबई इंडियन्सने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर केकेआरला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलं. हार्दिक पंड्याने होम ग्राउंडवरील पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग 11 निवडताना एका नव्या खेळाडूला संधी दिली आहे. मोहालीचा 23 वर्षीय क्रिकेटर अश्वनी कुमार हा मुंबईकडून आजच्या सामन्यात पदार्पण करणार आहे. तर प्लेईंग 11 मध्ये विल जॅकचं सुद्धा पुनरागमन झालं आहे. तर केकेआरच्या सुद्धा प्लेईंग 11 मध्ये सुनील नरेनची पुन्हा एंट्री झाली असून तो मोईन अलीच्या जागी खेळेल.
हेही वाचा : IPL 2025 : MI च्या चाहत्यांसाठी खुशखबर! जसप्रीत बुमराहच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, समोर आला Video
23 वर्षांचा अश्वनी कुमार हा पंजाबच्या मोहाली येथील असून तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघाकडून त्याचं आयपीएलमध्ये पदार्पण होतं आहे. अश्वनी हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे जो डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यात उत्कृष्ट आहे . 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई फ्रँचायझीने त्याला 30 लाख रुपयांना करारबद्ध केले होते. तो गेल्या हंगामात पंजाब किंग्ज संघाचा भाग होता परंतु प्लेइंग 11 मध्ये त्याला स्थान मिळाले नाही.
अश्वनी कुमारने 2022 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबसाठी पदार्पण केले होते त्यात त्याने फक्त चार सामने खेळले. यात 8.50 च्या इकॉनॉमीने त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत. अश्वनीने पंजाबसाठी दोन प्रथम श्रेणी आणि चार लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत.
रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, आंक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती