Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'...तर तुम्हाला संघातून वगळलं जाईल'; रोहित शर्माचा उल्लेख करत एक्स कॅप्टनचं सूचक विधान

IPL 2025 Rohit Sharma Struggle: रोहित शर्माला आयपीएलमधील मुंबईच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये केवळ 21 धावा करता आल्या आहेत.

'...तर तुम्हाला संघातून वगळलं जाईल'; रोहित शर्माचा उल्लेख करत एक्स कॅप्टनचं सूचक विधान

IPL 2025 Rohit Sharma Struggle: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने सोमवारी इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वात पहिला विजय नोंदवला. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला मुंबईच्या संघाने वानखेडे स्टेडियमवर 8 विकेट्स राखून विजय मिळवला. 117 धावांचा पाठलाग करताना मुंबईने 8 विकेट्स अन् 49 चेंडू राखून सहज विजय मिळवला. मात्र फलंदाजीसाठी उत्तम असलेल्या वानखेडेच्या मैदानावरही रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा या स्पर्धेत तिसऱ्यांदा स्वस्तात तंबूत परतला. आता यावरुनच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने रोहितच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

आकडेवारी चिंताजनक

मुंबईने आयपीएल 2025 च्या पर्वात आतापर्यंत तीन सामने खेळले असून यात रोहितने अनुक्रमे 0, 8 आणि 13 धावा केल्या आहेत. तीन सामन्यात रोहितने 7 च्या सरासरीने 21 धावा केल्या आहेत. मागील पाच पर्वांमध्ये रोहितला केवळ एकदा 400 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. ही आकडेवारी चिंताजनक असून याबद्दल वॉर्नने थेट मत व्यक्त करताना रोहित शर्मा केवळ क्रिकेटमधील बडं प्रस्थ असल्याने संघात टिकून आहे, असं म्हटलंय. मात्र आता रोहितला कामगिरी करुन दाखवावीच लागेल असंही मायकल वॉर्न म्हणालाय.

तुमचं नाव रोहित शर्मा नसेल तर...

रोहित शर्मा कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्येही सबस्टीट्यूट खेळाडू महणून खेळला. तो सामन्यातील 16 व्या ओव्हरला फिल्डींगसाठी आला. या साऱ्या गोष्टींचा विचार करुन वॉर्नने, "तुम्ही त्याच्या कामगिरीची आकडेवारी पाहा. आपण रोहित शर्माबद्दल केवळ फलंदाज म्हणून बोलूयात कारण तो सध्या कर्णधार नाही. आता तुम्हाला त्याची कामगिरी ही सरासरी कामगिरी वाटेल. कारण ही आकडेवारी खरोखरच सर्वसामान्य आहे. तुमचं नाव रोहित शर्मा नसेल तर या आकडेवारीसहीत तुम्हाला कधी ना कधी संघातून वगळलं जाईल यात शंका नाही. रोहित शर्मासारख्या खेळाडूला ही अशी आकडेवारी शोभत नाही," असं स्पष्टपणे सांगितलं. 

केवळ फलंदाज म्हणून पाहिलं पाहिजे

"रोहित कर्णधारही असेल तर त्याच्या ज्ञानाचा फायदा होतो. आपण जे भारतीय संघाबरोबर वारंवार पाहिलं आहे की त्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा संघाला फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. हे पूर्वी मुंबईच्या संघाबद्दलही दिसून आलं. मात्र केवळ फलंदाज म्हणून हे आकडे रोहितला शोभत नाहीत. आता केवळ फलंदाज म्हणून रोहितकडे पाहिले पाहिजे आणि त्याच्या कामगिरीचं अवलोकन केलं पाहिजे. तो आता कर्णधार नसल्याने जागा टिकवून ठेवण्यासाठी त्याला धावा करणं गरजेचं आहे," असं वॉर्न म्हणाला.

प्लेइंग इलेव्हनमधून काढणार? वॉर्न म्हणाला...

मात्र त्याचवेळी आपण रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देणार नाही असंही वॉर्न म्हणाला. रोहितमुळे मुंबईच्या संघाच्या फलंदाजीमध्ये एक्स फॅक्टर कायम राहतो असं वॉर्न म्हणाला. 

Read More