IPL 2025 MI vs PBKS, Akash Ambani Shreyas Iyer Viral Video: इंडियन प्रिमिअर लीगच्या इतिहासामध्ये केवळ तिसऱ्यांदा पंजाब किंग्जचा संघ 29 मे रोजी प्लेऑफचा सामना खेळणार आहे. तब्बल 11 वर्षानंतर म्हणजेच 2024 नंतर पहिल्यांदाच पंजाबच्या संघाने पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसरं स्थान निश्चित करत प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला. सोमवारी प्रियांश आर्याची संयमी खेळी आणि जॉश इंग्लीशच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या संघाला सात विकेट्सने पराभूत करत स्थान निश्चित करत प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला आहे.
मुंबई आणि पंजाबच्या संघादरम्यान सोमवारी झालेला सामना हा दुसरं स्थान कोण निश्चित करणार या दृष्टीने महत्त्वाचा होता. पहिल्या दोन स्थानांवर खेळणाऱ्या संघांना अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी असतात. त्यामुळेच या सामन्याला फार महत्त्व होतं. मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेलं 185 धावांचं आवाहन पंजाबच्या संघाने 9 चेंडू शिल्लक असतानाच गाठलं. या सामन्यात अनेक रंजक क्षण कॅमेरात कैद झाले. यापैकीच एक क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेला हा सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी उपस्थित होते. पहिला डाव अर्ध्याहून अधिक संपला होता त्यावेळी आकाश अंबानींनी सीमारेषेजवळ फिल्डींग करणारा पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरचं लक्ष वेधून घेतलं.
आकाश अंबानी श्रेयसबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आकाश अंबानींनी श्रेयसबरोबरच कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचं लक्षही वेधून घेतलं आहे. पहिल्या डावातील 18 व्या ओव्हरमध्ये मुंबईचा सूर्यकुमार यादव या पर्वातील त्याचं पाचवं अर्धशतक झळकावण्यापासून काही धावा दूर असतानाच हा प्रकार घडला. आकाश अंबानींनी हाक मारल्यानंतर श्रेयस अय्यर अगदी जाहिरातीच्या बोर्डवर वाकून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं.
या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. आता याच कारणामुळे अनेकजण दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल याबद्दलचे मजेदार फोटो चाहत्यांनी शेअर केले आहे.
1) काय रे अय्यर तुला...
Akash Ambani and Shreyas Iyer... #PBKSvsMI pic.twitter.com/CzeKLGnioi
— Robin (@robinchopra10) May 26, 2025
2) काही सेटलमेंट होऊ शकते का?
Akash Ambani to Shreyas Iyer
— विंध्यवासी (@rahulpandit1i) May 26, 2025
Kuch le de ke kar sakte ho kya . #PBKSvMI pic.twitter.com/45st09ctpi
3) अंबानींची ऑफर श्रेयसला पटली नाही?
It seems Shreyas Iyer wasn't convinced with the deal Ambani offered...! pic.twitter.com/4JW2OA9pBZ
— Dinda Academy (@academy_dinda) May 26, 2025
4) अंबानींचा संवाद साधण्याचा प्रयत्न
MI owner Aakash Ambani trying to have a conversation with Shreyas Iyer during the match. #PBKSvsMI pic.twitter.com/4BlB6Iub4P
— CricXtasy (@CricXtasy) May 26, 2025
5) पुढल्या पर्वात मुंबईचा कर्णधार होण्याची ऑफर?
Poaching local boy for MI captaincy in next season by Ambani.
— Ex Home Minister of India (@arya_ekdeewana1) May 26, 2025
150cr+captaincy deal done #ShreyasIyer #MIvsPBKS #PBKSvsMI #AkashAmbani pic.twitter.com/jyP00a5NMi
6) काही सेटलमेंट होऊ शकते का?
Akash Ambani to Shreyas Iyer
— (@Subhash8084) May 26, 202
कुछ ले देकर कर सकते हो क्या #PBKSvMI pic.twitter.com/4dEu4RPRmE
दरम्यान, पंजाबचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरल्याने तो तीन संघांना प्लेऑफमध्ये घेऊन जाणारा आयपीएलमधील पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी त्याने 2020 मध्ये दिल्लीच्या संघाला प्लेऑफमध्ये नेलं आहे. 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालीच कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने जेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरलं होतं.