Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025: ...म्हणून यंदा MI आणि RCB एकमेकांविरोधात खेळणार एकच मॅच; कारण फारच रंजक

Why MI Will Face RCB Only Once: अनेक संघांविरुद्ध मुंबई दोन सामने खेळणार असताना बंगळुरुविरुद्ध एकच सामना का खेळणार?

IPL 2025: ...म्हणून यंदा MI आणि RCB एकमेकांविरोधात खेळणार एकच मॅच; कारण फारच रंजक

Why MI Will Face RCB Only Once: इंडियन प्रिमिअर लीगचं 18 वं पर्व सध्या खेळवलं जात असून ही स्पर्धा 22 मार्चपासून सुरु झाली आहे. 25 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरणार असं पहिल्या काही सामन्यांमधून स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेमध्ये कोणताही संघ फेव्हरेट नाही हे सुरुवातीच्या काही सामन्यांमधील आकडेवारीवरुन दिसत आहे. अनेक सामने अगदी अटीतटीचे झाल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. 

आरसीबी आणि मुंबई एकमेकांविरुद्ध एकच सामना खेळणार

पहिला सामना कोलकाता विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झाला. कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेला हा सामना 22 बॉल आणि 7 विकेट्स राखून हा सामना पाहुण्या आरसीबी संघाने जिंकला. त्यानंतरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या संघादरम्यान झालेला चेपॉकच्या मैदानावरील सामना यजमान चेन्नईच्या संघाने जिंकला. आज मुंबई आणि बंगळुरुचा सामना वानखेडेच्या मैदानावर होणार आहे. मात्र एकीकडे मुंबई अनेक संघांविरुद्ध किमान दोन सामने खेळणार असला तरी बंगळुरु आणि मुंबईच्या संघातील एकमेव सामना असणार आहे. मात्र मुंबई आणि बंगळुरुचा संघ एकमेकांविरोधात एकच सामना का खेळणार आहेत हे अनेक चाहत्यांना समजलेलं नाही. त्याचबद्दल जाणून घेऊयात...

आयपीएल सामन्यांची रचना कशी?

एकूण 74 सामनेच खेळवले जावेत या हेतूने बीसीसीआयने आतापर्यंत स्पर्धेतील सामन्यांचं नियोजन करताना डबल राऊण्ड-रॉबीन सिस्टीमचा वापर केलेला नाही. आयपीएलमध्ये 2022 पासून 10 संघ खेळत असले तरी सामन्यांची संख्या वाढलेली नाही. सध्याच्या रचनेनुसार प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध दोन सामने खेळतो तर चार संघांविरुद्ध एकच सामना खेळतो. यापैकी दोन सामने घरच्या मैदानावर आणि दोन घराबाहेरील मैदानांवर खेळवले जातात. 

दोन गटांमध्ये विभाजन

बीसीसीआयने 10 संघांचं दोन गटांमध्ये विभाजन केलं आहे. यापैकी एका गटात पाच सामने-एकमेकांविरुद्ध खेळवले जातील असे संघ आहेत. या गटातील प्रत्येक संघ दुसऱ्या संघाविरुद्ध दोन सामने खेळणार आहे. तर दुसऱ्या गटातील संघ एकमेकांविरुद्ध चार सामने खेळणार आहेत. यंदाच्या रचनेनुसार आरसीबी आणि मुंबई हे एकमेकांविरुद्ध केवळ एकच सामना खेळतील. याच कारणाने कोहली आणि रोहितचा समावेश असलेले हे संघ एकदाच आमने-सामने येतील.

आरसीबी विरुद्ध सीएसके डबल धमाका

यंदाच्या पर्वात आरसीबी आणि सीएसकेचा संघ एकमेकांविरुद्ध दोनदा खेळणार आहे. पहिला सामना 28 मार्च रोजी झाला तर दुसरा सामना 3 मे रोजी होणार आहे. कोलकाता आणि बंगळुरुचे संघ पुन्हा एकदा 17 मे रोजी एकमेकांविरोधात खेळणार आहेत. 

Read More