Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तुम्ही तुमच्या इच्छेनुसार...', IPL सामन्यात 'रिटायर्ड आऊट' केल्यानंतर तिलक वर्माने अखेर सोडलं मौन, 'कोच, स्टाफ...'

IPL 2025: लखनऊ सुपरजायंट्सविरोधातील (Lucknow Super Giants) सामन्यात मुंबईचा फलंदाज तिलक वर्माला (Tilak Varma) रिटायर्ड आऊट करण्यात आलं होतं. तिलकने त्यावेळी 23 चेंडूत 25 धावा केल्या होत्या.   

'तुम्ही तुमच्या इच्छेनुसार...', IPL सामन्यात 'रिटायर्ड आऊट' केल्यानंतर तिलक वर्माने अखेर सोडलं मौन, 'कोच, स्टाफ...'

IPL 2025: इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने (Tilak Varma) जबरदस्त कामगिरी केली. तिलक वर्माने 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 33 चेंडूत 59 धावा केल्या. तिलकने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या आधारे मुंबई संघ दिल्लीसमोर 206 धावांचं आव्हान उभं करु शकली. 

तिलकने रिटायर्ड आऊटवर सोडलं मौन

लखनऊविरोधातील सामन्यात व्यवस्थापनाने रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिलक वर्मा चर्चेत आला होता. तिलक वर्मा त्यावेळी 23 चेंडूंमध्ये 25 धावांवर खेळत होता. तिलकच्या जागी मिचेल सेंटनरला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. पण सेंटनर आणि कर्णधार हार्दिक पांड्या काही कमाल करु शकले नाहीत.

मुंबई इंडियन्सने लखनऊविरोधातील सामना 12 धावांनी गमावला होता. या सामन्यानंतर तिलक वर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या आधी बंगळुरुविरोधातील सामन्यात अर्धशतक ठोकलं होतं.

तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्याच्या निर्णयावर अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र तिलक वर्माने यावर काहीही भाष्य केलं नव्हतं. पण अखेर आता तिलक वर्माने यावर मौन सोडलं आहे. दिल्लीविरोधातील विजयानंतर बोलताना तिलक वर्माने रिटायर्ड आऊट झाल्यावर आपल्या नेमक्या काय भावना होत्या हे सांगितलं आहे. "मी फक्त हाच विचार करत होतो की, हा निर्णय संघाच्या हितासाठी घेण्यात आला आहे," असं त्याने म्हटलंय 

तिलक वर्माने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटलं की, "काही नाही, मी फक्त हाच विचार करत होतो की हा निर्णय संघाच्या हितासाठी घेण्यात आला आहे. यामुळे मी तो निर्णय फार सकारात्मकपणे घेतला होता. मी त्याबद्दल नकारात्मकपणे विचार केला नाही. तुम्ही हे नेमकं कशाप्रकारे घेता हे महत्त्वाचं आहे".

पुढे त्याने म्हटलं की, "यामुळेच मी अशाप्रकारे विचार करत होतो. माझी फक्त इतकीच इच्छा आहे की, जिथेही फलंदाजी करेन ती सहजपणे व्हावी. यासाठी मी कोच आणि स्टाफला तुमची इच्छा असेल तिथे खेळवा असं सांगितलं आहे. तुम्ही चिंता करा. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन".

तिलक वर्मा आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. तिलक वर्माने 5 डावात 42 च्या सरासरीने 210 धावा केल्या आहेत. सध्याच्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सूर्यकुमारच्या नावावर आहे. सूर्यकुमार 6 डावांमध्ये 47.80 च्या सरासरीने 239 धावा केल्या. 

Read More