Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025 Playoffs: कोणत्या 4 टीम प्लेऑफ खेळणार ठरलं; RCB आणि MI मध्ये 'करो या मारो'चा सामना?

IPL 2025 Playoffs Who Will Play Against Whom: मुंबईचा संघ बुधवारी प्ले ऑफसाठी पात्र ठरला. गुजरात, बंगळुरु आणि पंजाब यापूर्वीच प्ले ऑफसाठी पात्र ठरलेत.

IPL 2025 Playoffs: कोणत्या 4 टीम प्लेऑफ खेळणार ठरलं; RCB आणि MI मध्ये 'करो या मारो'चा सामना?

IPL 2025 Playoffs Which Teams Will Play Against Each Other: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वात प्ले ऑफमध्ये कोणते संघ खेळणार हे निश्चित झालं आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने करो या मरोच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवत आपलं प्ले ऑफमधील स्थान निश्चित केलं आहे. आयपीएलच्या प्ले ऑफचं चित्र काही दिवसांपूर्वीच जवळपास निश्चित झालेलं. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे तीन संघ यापूर्वीच प्ले ऑफसाठी पात्र ठरले होते. बुधवारी मुंबईच्या संघाने प्ले ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 18.2 ओव्हरमध्ये 121 धावांवर तंबूत परतला. मुंबईने हा सामना 59 धावांनी जिंकत प्ले ऑफसाठी पात्र झालेला चौथा संघ ठरला.

प्ले ऑफचे सामने कसे होणार?

प्लेऑफमध्ये पहिला सामना क्वालिफायर 1 आणि दुसरा सामना एलिमिनेटर सामना असेल. पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे.  एलिमिनिटेरचा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये होईल. हे दोन्ही सामने न्यू चंदीगडमध्ये होणार आहे. तर क्वालिफायर 2 चा सामना क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघात होईल. तर क्वालिफायर 1 चा विजेता आणि क्वालिफायर 2 चा विजेता संघ फायनलचा सामना खेळतील. हे दोन्ही सामने नव्या वेळापत्रकानुसार अहमदाबादमध्ये होतील.

दोन संघांना पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची संधी

यंदाच्या प्लेऑफमध्ये खेळणाऱ्या संघांपैकी दोन संघ असे आहेत ज्यांनी आयपीएलचे जेतेपद कधीच पटकावलेलं नाही. बंगळुरु आणि पंजाब संघाला आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. तर दुसरीकडे गुजरातच्या संघाला दुसरं जेतेपद खुणावत आहे. याशिवाय प्ले ऑफमध्ये लेट पण थेट एन्ट्री घेतलेल्या मुंबई इंडियन्सची नजर सहाव्या जेतेपदावर असेल.

कोण कोणत्या क्रमांकावर राहणार?

सध्याची स्थिती पहिल्यास पहिल्या क्रमांकावर गुजरातचा संघ कायम राहील अशी दाट शक्यता असून दुसऱ्या स्थान बंगळुरुचा संघ असेल. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी पंजाब व मुंबईचा संघ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झालं तर पहिला क्वालिफायर गुजरात आणि बंगळुरुमध्ये होईल आणि एलिमिनिटेरमध्ये मुंबई आणि पंजाब आमने-सामने असतील. अशा परिस्थितीत क्वालिफायर 1 च्या सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला आणि एलिमिनेटरमध्ये मुंबई जिंकली तर क्वालिफायर 2 मध्ये 'करो या मरो'च्या सामन्यात मुंबई आणि बंगळुरु आमने-सामने असतील. यामधून जिंकणारा संघ मग गुजरातविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे - 

29 मे 2025 - क्वालिफायर 1- पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये मुल्लानपूर, न्यू चंदीगढ येथे सामना होईल.

30 मे 2025 - एलिमिनेटर- तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये मुल्लानपूर, न्यू चंदीगढ येथे सामना होईल.

1 जून 2025 - क्वालिफायर 2- क्वालिफायर एकमधील पराभूत संघ एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाविरुद्ध अहमदाबादच्या मैदानात सामना खेळेल.

3 जून 2025 - क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 जिंकणारे संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळतील. 

Read More