Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

RCB vs MI: रोहित, बुमराहचं कमबॅक? RCB विरुद्ध अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11

IPL 2025 : मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सीजनमध्ये एकूण 4 सामने खेळले असून यापैकी 1 सामना त्यांनी जिंकलाय. तर आरसीबीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांना त्यांच्या मागच्या सामन्यात पराभव मिळालाय.

RCB vs MI: रोहित, बुमराहचं कमबॅक? RCB विरुद्ध अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11

MI VS RCB : आयपीएल 2025 चा (IPL 2025) 20 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Mumbai Indians VS Royal Challengers Bengluru) यांच्यात होणार आहे. मुंबईचं होम ग्राउंड असणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना होणार असून यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सीजनमध्ये एकूण 4 सामने खेळले असून यापैकी 1 सामना त्यांनी जिंकलाय. तर आरसीबीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांना त्यांच्या मागच्या सामन्यात पराभव मिळालाय. तेव्हा मुंबई आणि आरसीबीमध्ये कोण बाजी मारून विजयीपथावर परतणार हे पाहणं महत्वाचं आहे. 

मुंबई आणि आरसीबीचा हेड टू हेड रेकॉर्ड :

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आयपीएलचे जुने संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 33 सामने खेळवले गेले असून यात 19 वेळा मुंबई इंडियन्सने तर 14 वेळा आरसीबीने विजय मिळवला आहे. यात आरसीबीचा सर्वोत्तम स्कोअर 235 धावा होता तर मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम स्कोअर 213 होता. वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये 11 सामने खेळवले गेले असून यात 8 सामन्यात मुंबईने तर 3 सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. 

हेही वाचा : लाईव्ह सामन्यात केलेल्या चुकीमुळे ईशांत शर्माला BCCI ने सुनावली मोठी शिक्षा

 

मुंबईसाठी विजय महत्वाचा : 

मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत नव्या सीजनमध्ये केवळ 1 सामना जिंकल्याने त्यांना विजयपथावर परतण्यासाठी आजचा सामना जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. आरसीबी विरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा संघात परतला ही त्यांच्या करता जमेची बाजू आहे. तसेच रोहित शर्माचे सुद्धा प्लेईंग 11 मध्ये पुनरागमन होऊ शकते. 

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 : 

हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक, रियान रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सेंटनर, दीपक चाहर, अश्विनी कुमार, विग्नेश पुथुर, ट्रेंट बोल्ट

आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11 : 

रजत पाटीदार (कर्णधार), फिल साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेविड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल

 

Read More