IPL 2025 : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला शनिवार 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2025 चा (IPL 2025) पहिला सामना हा गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR VS RCB) या संघांमध्ये होणार असून हा सामना प्रसिद्ध ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात येईल. मात्र नव्या सीजनच्या पहिल्याच सामन्यावर टांगती तलवार असून सामन्यादरम्यान हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ज्या दिवशी सामना होणार आहे त्या दिवशी कोलकातामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय.
हवामान खात्याच्या माहितीनुसार आयपीएलच्या पहिल्या सामन्यादरम्यान शनिवारी ईडन गार्डन परिसरात 80 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्यूवेदर डॉट कॉमच्या माहितीनुसार केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान दिवसभर पावसामुळे मैदानावर कव्हर राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी 7: 30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी मैदानात पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच जेव्हा सामना सुरु होईल या दरम्यान 8 ते 9 वाजता 50 टक्के पावसाची शक्यता आहे. तर या वेळेनंतर 50 टक्के पाऊस पडू शकतो.
यंदा केकेआर आणि आरसीबी या दोन्ही संघांचे कर्णधार बदलले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद आयपीएल 2025 करता अजिंक्य रहाणेकडे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं कर्णधारपद रजत पाटीदारकडे देण्यात आहे. दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या सामन्याची सुरुवात विजयाने करू इच्छितील. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 चं विजेतेपद जिंकलं. तेव्हा यंदा अधिक चांगला परफॉर्मन्सकडून विजेतेपदाचं टायटल आपल्याकडे ठेवण्याचा ते प्रयत्न करतील. मागील वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने विजेतेपद पटकावले होते, परंतु श्रेयसला केकेआरने रिटेन केलं नाही.
हेही वाचा : क्रीडा क्षेत्रातील सर्वात महागडा घटस्फोट, खेळाडूने पत्नीला पोटगीत दिले 14500000000 रुपये
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे आतापर्यंत आयपीएलमध्ये 35 वेळा आमने सामने आले असून दरम्यान आरसीबीने 14 तर 21 सामन्यात केकेआरने विजय मिळवला. आरसीबीच्या विजयाची टक्केवारी 40 टक्के असून तर पराभवाची टक्केवारी 60 इतकी आहे.