Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

श्रेयसने रोहित शर्माचं लक्ष्य विचलित केलं अन् व्हायचं तेचं घडलं... 'या' मास्टरस्ट्रोकनंतर मुंबई सावरलीच नाही

IPL 2025 Captain Shreyas Iyer Trick Rohit Sharma: गुजरातविरुद्धचा सामना जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला श्रेयस अय्यरने कसं अडवलं पाहा

श्रेयसने रोहित शर्माचं लक्ष्य विचलित केलं अन् व्हायचं तेचं घडलं... 'या' मास्टरस्ट्रोकनंतर मुंबई सावरलीच नाही

IPL 2025 Captain Shreyas Iyer Trick Rohit Sharma: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्जच्या संघाने कर्णधार श्रेयस अय्यरचं नेतृत्व आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला धूळ चारली. या सामन्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडलया. सामन्याचा टॉस नियोजित वेळी झाला तरी पावसामुळे सामना दोन तास उशीरा सुरु झाला. सायंकाळी साडेसातला जो सामना होणार होता तो 9.44 रोजी सुरु झाला. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने हिटमॅन रोहित शर्माचा काटा काढण्यासाठी एक चक्रव्यूह रचला आणि रोहित त्यात अलगद अडकला. 

पंजाबला मिळाली दुसरी संधी

पंजाबच्या संघाने यंदाच्या पर्वात दमदार कामगिरी केली. केवळ क्वालिफायर-1 च्या सामन्यात बंगळुरुकडून झालेला पराभव वगळता पंजाबने संपूर्ण पर्वात उत्तम खेळ केला. क्वालिफायर-1 चा सामना एकतर्फी झाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली लीग स्टेजमध्ये पंजाबचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये असल्याने क्वालिफायर-1 मधील पराभवानंतरही पंजाबकडे क्वालिफायर-2 च्या माध्यमातून दुसरी संधी चालून आली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाला पराभूत करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाविरुद्ध पंजाबला भन्नाट काहीतरी करावं लागणार हे निश्चित मानलं जात होतं. या सामन्यात झालंही तेच. नाणेफेक जिंकून श्रेयसने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

श्रेयसचा निर्णय पाहून हरभजनही गोंधळला

नाणेफेक वेळेत झाल्यानंतरही पावसामुळे सामना वेळेत सुरु झाला नाही. दोन तासाहून अधिक उशीराने सामना सुरु झाला. पाऊस थांबल्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीमुळे काही वेळातच सामना सुरु झाला. साडेनऊ वाजता मैदानाची पाहणी केल्यावर सामना 20 ओव्हरचाच होईल असं निश्चित करण्यात आलं. श्रेयसने मुंबईविरुद्ध खेळत असल्याचं लक्षात घेत गोलंदाजीमध्ये काही बदल केले. अर्शदीप सिंहने पहिली ओव्हर टाकली. मात्र दुसरी ओव्हर काइल जॅमिसनसारखा दुसरा मुख्य गोलंदाज संघात असतानाच श्रेयसने वेगळाच निर्णय घेतला. हा निर्णय पाहून कॉमेंट्री बॉक्समधील हरभजन सिंगही गोंधळून गेला. त्यानेही श्रेयसने असं का केलं असा सवाल केला. मात्र श्रेयसचा हा डाव कामी आला. 

नेमकं श्रेयसने काय केलं?

श्रेयसने सामन्यातील दुसरीच ओव्हर मार्कस स्टोयनिसला दिली आणि त्याच ओव्हरमध्ये रोहितचा घात झाला. श्रेयसने फूल टाइम गोलंदाजावर विश्वास टाकण्याऐवजी अष्टपैलू गोलंदाज मार्कस स्टोयनिसकडे चेंडू सोपवला. मुद्दाम श्रेयसने हा निर्णय घेतला. ज्यामुळे रोहित शर्मा गोंधळून गेला. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रोहितने पुढे येऊन चौकार लगावला. त्यानंतर आता या ओव्हरमध्ये रोहित शर्मा तुफान फटकेबाजी करणार असं सगळ्यांना वाटलं. नियमित गोलंदाजाऐवजी अष्टपैलू गोलंदाजाकडे चेंडू सोपवल्याने रोहित शर्मा याचा पूर्ण फायदा घेणार असं वाटत होतं. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारायला गेला आणि झेलबाद झाला. विशयांक विजय कुमारने बॉण्ड्रीजवळ त्याचा कॅच घेतला. गुजरातविरुद्धचा सामना जिंकवून देणारा मॅच विनर रोहित शर्मा 7 बॉलमध्ये 8 धावा करुन बाद झाला.

1)

2)

आता पंजाबचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 3 जून रोजी अंतिम सामना खेळणार आहे.

Read More