Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सीजनमधील शेवटच्या सामन्यात दिल्लीची विजयी सलामी, पंजाबला टॉपवर जाण्यापासून रोखलं

PBKS VS DC : आयपीएल 2025 मधील दिल्लीचा शेवटचा सामना होता त्यामुळे सीजनमधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात देखील यश आले. दिल्लीच्या समीर रिझवीने सिक्स मारून सामना जिंकवून दिला. 

सीजनमधील शेवटच्या सामन्यात दिल्लीची विजयी सलामी, पंजाबला टॉपवर जाण्यापासून रोखलं

PBKS VS DC : आयपीएल 2025 मध्ये 66 वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला धूळ चारून 6 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना आयपीएल 2025 मधील दिल्लीचा शेवटचा सामना होता त्यामुळे सीजनमधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात देखील यश आले. दिल्लीच्या समीर रिझवीने सिक्स मारून सामना जिंकवून दिला. 

पंजाब किंग्सने दिलं 200 हुन अधिक धावांचं आव्हान : 

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत 8 विकेट गमावून 206 धावा केल्या. यात श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या तर मार्कस स्टोनीसने 44 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सकडून मुस्ताफिझूर रहमानने 3, विप्राज आणि कुलदीपने 2 तर मुकेश कुमारने 1 विकेट घेतली. पंजाब किंग्सने दिल्लीला विजयासाठी 207 धावांचे आव्हान दिले होते.

6 विकेट्स राखून पूर्ण केलं विजयाचं टार्गेट : 

दिल्ली कॅपिटल्सकडून विजयाचं आव्हान पूर्ण करताना केएल राहुल (35) आणि फाफ डू प्लेसिस (35) या दोघांनी चांगली सुरुवात केली. तर करूण नायरने 44, सेदिकुल्लाह अटलने 22, समीर रिझवीने 58 तर ट्रिस्टन स्तबने 18 धावांची कामगिरी केली. यासह दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्स राखून सामना जिंकला आणि आयपीएल 2025 चा शेवट विजयाने केला. दिल्लीच्या विजयामुळे पंजाब किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातला मागे टाकून नंबर 1 चं स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. आता पंजाब किंग्सला त्यांचा पुढील सामना 26 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळायचा आहे.  

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग 11  : 

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), सेदिकुल्ला अटल, करुण नायर, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार

पंजाब किंग्स प्लेईंग 11 : 

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग

Read More