IPL 2025 Qualifier 2 : आयपीएल 2025 मध्ये 1 जून रोजी क्वालिफायर 2 सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (Mumbai Indians VS Punjab Kings) यांच्यात खेळवला जात आहे. क्वालिफायर 2 चा विजेता संघ हा थेट 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत ट्रॉफी विजयासाठी फायनल सामना खेळेल. यात सामन्यापूर्वी पंजाब किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांनी क्वालिफायर 2 सामन्यासाठी प्लेईंग 11 मध्ये बदल केले आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर 2 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी झालेला टॉस पंजाब किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळाले. मुंबई इंडियन्सने 30 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून क्वालिफायर २ मध्ये धडक मारली. तर पंजाब किंग्सने 29 जून रोजी आरसीबीकडून पराभूत झाल्याने क्वालिफायर २ सामन्यात पोहोचली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या प्लेईंग 11 मध्ये मागच्या सामन्याच्या तुलनेत १ बदल केला असून रीस टोपली या प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट केलं आहे. रीस टोपली हा इंग्लंडचा खेळाडू असून त्याने यापूर्वी आयपीएलचे 5 सामने खेळले असून यात 5 विकेट घेतले आहेत. तर पंजाब किंग्सने सुद्धा प्लेईंग 11 मध्ये बदल केला असून युझवेंद्र चहलचा संघात समावेश केला आहे.
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल