IPL Playoffs Scenario : आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये क्वालिफिकेशनच्या उंबरठ्यावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) सलग दुसऱ्या पराभवामुळे धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी आरसीबी विरुद्ध त्यांचा पराभव झाला होता तर मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सकडूनही (Kolkata Knight Riders) त्यांचा 14 धावांनी पराभव झाला आहे. या पराभवामुळे प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्याच्या दिल्लीच्या आशेवर पाणी फेरू शकते. आयपीएल 2025 (IPL 2025) ही स्पर्धा आता अतिशय निर्णायक वळणावर असून पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 5 मध्ये असणाऱ्या संघांच्या सामन्यातील विजय किंवा पराभवामुळे प्लेऑफची समीकरण बदलू शकतात.
अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. केकेआरच्या फलंदाजांनी 9 विकेट गमावून 204 धावा केल्या, आणि विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करण्यात दिल्लीचा संघ अपयशी ठरला आणि त्यामुळे कोलकाताने स्पर्धेतील त्यांचा चौथा सामना जिंकला.
दिल्लीच्या पराभवानंतर आता आयपीएल 2025 च्या प्लेऑफची रेस आता अधिकच रंजक झाली आहे. आयपीएल 2025 मध्ये सध्या पॉईंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ नंबर 1 वर असून त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स पोहोचली असून ते +0.889 च्या नेट रनरेटने पुढे आहेत. गुजरात टायटन्सचा संघ नंबर 3 वर असून त्यांचा नेट रनरेट +0.748 असा आहे. तर चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सअसून त्यांचा नेट रेनरेट हा +0.362 आहे.
हेही वाचा : मॅचनंतर कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं? Video Viral
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल 2025 मध्ये त्यांचा चौथा पराभव मिळाला आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने आतापर्यंत 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवलाय. तर ते सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात १२ पॉईंट्स असून ते अजूनही प्लेऑफच्या रेसमध्ये कायम आहेत. 16 पॉईंट्स मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित 4 पैकी 2 सामने जिंकायचे आहेत. परंतु या सामन्यात विजयी होण्यात ते अपयशी ठरले तर त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये क्वालिफाय होणं अवघड होईल.