Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025 Playoffs: RCB सहज क्वालिफाय होणार; 2 टीम पडल्या बाहेर तर मुंबई इंडियन्सला...

IPL 2025 Playoffs Qualification Scenario For All Teams: उरलेल्या 16 सामन्यांमध्ये प्लेऑफ्सच्या शर्यतीत 8 संघांपैकी कोण बाजी मारणार हे निश्चित होणार.

IPL 2025 Playoffs: RCB सहज क्वालिफाय होणार; 2 टीम पडल्या बाहेर तर मुंबई इंडियन्सला...

IPL 2025 Playoffs Qualification Scenario: इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या प्लेऑफ्ससाठी कोणते चार संघ पात्र ठरणार यासंदर्भातील चुरस दिवसोंदिवस अधिक वाढताना दिसत आहे. 4 मे रोजी झालेल्या दोन सामन्यानंतर टॉप चार संघांच्या यादीत मोठा फेरफार झाला आहे. या मालिकेमधील 16 सामने शिल्लक असून 10 पैकी 8 संघ अव्वल चार स्थानांसाठी शर्यतीत आहेत. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ वगळता अजूनही सर्वच संघ तांत्रिकदृष्ट्या प्लेऑफ्ससाठी पात्र ठरु शकतात. कोणता संघ कितव्या स्थानी आहे, पॉइण्ट्स टेबलची स्थिती काय आहे? कोणते संघ सहज पात्र होणं शक्य आहे? कोणाला किती सामने जिंकून सर्वोत्तम किती गुण मिळवता येतील यावर नजर टाकूयात...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु -

लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचे सामने शिल्लक असलेला आरसीबीचा संघ अव्वल स्थानी असून मुंबई आणि गुजरातविरुद्ध सामने नसल्याने उर्वरित सहाही सामने जिंकून ते 22 पॉइण्ट्सपर्यंत पोहचू शकतील. उर्वरित तीन पैकी एक सामना जिंकला तरी 18 गुणांच्या जोरावर हा संघ टॉप चारमध्ये पात्र ठरेल.

पंजाब किंग्ज -

पंजाबचा संघाला दिल्ली, मुंबई आणि राजस्थानविरुद्धचे तीन सामने खेळायचे आहेत. लखनऊला दुसऱ्यांदा पराभूत करत पंजाब दुसऱ्या स्थानी पोहोचलाय. या तीन पैकी दोन सामने जिंकले तर ते किमान 18 गुणांपर्यंत पोहचतील. सर्व सामने जिंकले तरी त्यांचे जास्ती जास्त 21 गुण होतील.

मुंबई इंडियन्स -

पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या मुंबईचे दिल्ली, गुजरात आणि पंजाबविरुद्धचे तीन सामने शिल्लक आहेत. किमान 18 गुणांसाठी त्यांना उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकावे लागतील. सर्व सामने जिंकले तरी त्यांचे सर्वाधिक गुण 20 असतील.

गुजरात टायटन्स -

चौथ्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाचे मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि चेन्नईविरुद्ध असे एकूण चार सामने शिल्लक आहेत. गुजरातने सर्व सामने जिंकले तर ते 22 गुणांसहीत पहिल्या स्थानी पोहोचतील. त्यांनाही मुंबईप्रमाणे पात्र ठरण्यासाठी चारपैकी किमान दोन सामने जिंकावे लागतील. जास्तीत जास्त ते 22 गुणांपर्यंत पोहोचतील.

दिल्ली कॅपिटल्स -

दिल्लीचा संघ पाचव्या स्थानी असून त्यांचे हैदराबाद, पंजाब, गुजरात आणि मुंबईच्या संघाविरुद्ध सामने शिल्लक आहेत. 10 सामन्यांमध्ये 12 गुण असणारा हा संघ जास्तीत जास्त 20 गुणांपर्यंत उडी मारु शकतो. त्यांना 18 गुण मिळवण्यासाठी उरलेल्या चारपैकी तीन सामने जिंकावे लागणार आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स -

कोलकात्याच्या संघाचे चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरुच्या संघाविरूद्धचे सामने शिल्लक आहेत. मुंबई आणि गुजरातबरोबर एकही सामना शिल्लक राहिलेला नसल्याने त्यांच्यासमोर केवळ आरसीबीचं कठीण आव्हान असणार आहे. सर्व सामने जिंकले तरी ते जास्तीत जास्त 17 गुण मिळवतील. 17 गुणांवर पात्र ठरण्यासाठी आरसीबी आणि पंजाबने त्यांचे दोनपैकी अधिक सामने जिंकू नये यासाठी देव पाण्यात ठेऊन बसावं लागणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स -

सातव्या स्थानी असणारा लखनऊचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीमधून बाहेर पडलेला नाही. त्यांचे बंगळुरु, गुजरात आणि सनरायझर्सविरुद्धचे सामने शिल्लक आहेत. लखनऊच्या संघाला तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकून नेट रन रेट सुधारुन इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. 10 गुण असणारा हा संघ जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंत झेप घेऊ शकतो. त्यांना नेट रनरेटच्या आधारावर प्लेऑफ्समध्ये प्रवेश मिळू शकतो.

सनरायझर्स हैदराबाद -

हैदराबादच्या संघाचे दिल्ली, कोलकाता, बंगळुरु आणि लखनऊच्या संघाविरुद्धचे एकूण चार सामने शिल्लक आहेत. हे सर्वा सामने जिंकले तरी सनरायझर्सचा संघ जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत उडी घेऊ शकतो. मात्र इतके गुण त्यांना पुरेसे ठरणार नाहीत असं चित्र दिसत आहेत. कारण उरलेल्या सात टीमपैकी चार टीम नक्कीच 14 पेक्षा अधिक गुण मिळवतील. 

fallbacks

राजस्थान रॉयर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीततून बाहेर पडले आहेत.

Read More