IPL 2025 : IPL 2025 स्पर्धा आता अतिशय रंगात आली आहे. प्लेऑफचे 4 संघ आता ठरले असून चौघांमध्ये आता टेबल टॉप करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. श्रेयस अय्यरच्या (Sheryas Iyyer) नेतृत्वात पंजाब किंग्सने सुद्धा यंदा प्लेऑफमध्ये धडक दिली असून ते सध्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्स संघाचा परफॉर्मन्स स्पर्धेत चांगला असला तरी त्यांच्या फ्रेंचायजीमध्ये सर्व काही ठीक नाही. पंजाब किंग्सची (Punjab Kings) सहमालकिण प्रीती झिंटाने (Preity Zinta) आपले बिझनेस पार्टनर मोहित बर्मन आणि नेस वाडिया यांच्या विरोधात न्यायालयात केस दाखल केली आहे. प्रीति जिंटा, नेस वाडिया आणि मोहित बर्मन पंजाब किंग्स संघात पार्टनर आहेत. पंजाब किंग्सचा संघ हा केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत येते. यात मोहित बर्मनकडे 48 टक्के शेअर्स असून, प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्याकडे 23-23 टक्के शेअर्स आहेत. तर उर्वरित शेअर्स हे करण पॉलकडे आहेत.
पंजाब किंग्समध्ये हा संपूर्ण वाद हा 21 एप्रिल 2025 रोजीआयोजीत करण्यात आलेल्या एक्स्ट्रा-ऑर्डिनेरी जनरल मीटिंगला घेऊन सुरु झाला. प्रीती झिंटाने आरोप लावला होता की ही मिटिंग कंपनी अधिनियम 2013 आणि अन्य सचिवीय नियमांनुसार योग्य प्रक्रिया पालन केल्याशिवाय आयोजित करण्यात आली होती. प्रीती झिंटाने यापूर्वी 10 एप्रिल रोजी इमेल द्वारे या एक्स्ट्रा-ऑर्डिनेरी जनरल मीटिंगवर आपत्ती असल्याचे सांगितले होते, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
हेही वाचा : Arshad Khan: गुजरातचा गोलंदाज तोंडावर आदळला, 4 चेंडूत 2 वेळा घसरला, अंगावर शहारा आणणारा VIDEO
प्रीती झिंटाने न्यायालयाला ही एक्स्ट्रा-ऑर्डिनेरी जनरल मीटिंग अवैध्य घोषित करण्यात यावी अशी मागणी केली होती. प्रीती झिंटा बिझनेस पार्टनर करण पॉल सोबत या मिटिंगमध्ये सामील झाली होती. परंतु दोघांनी या कार्यवाही दरम्यान मुनीश खन्ना याला डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यास विरोध केला. प्रीती झिंटा आणि करण पॉल याचा विरोध असताना सुद्धा मोहित बर्मनने नेस वाडियाच्या समर्थनात मिटिंग सुरु ठेवली. प्रीती झिंटाने न्यायालयाला विनंती केली आहे की ही बैठक अवैध घोषित करावी आणि मुनीश खन्ना यांना डायरेक्टर म्हणून काम करण्यापासून रोखावे. त्यांनी बैठकीदरम्यान घेतलेले कोणतेही निर्णय थांबवण्यास सांगावे.
कायदेशीर लढाई सुरु असताना सुद्धा, प्रीटी झिंटा आयपीएल 2025 हंगामात पंजाब किंग्स संघाला पाठिंबा देत आहे, पंजाब संघाने या सीजनमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने 2014 नंतर प्रथमच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब किंग्सला लीग स्टेजचे दोन सामने अजून खेळायचे आहेत.