Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2024: वडिलांच्या दोन्ही किडनी खराब, आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस; तरीही IPL मध्ये धुमाकूळ घालतोय 24 वर्षीय खेळाडू

Punjab Kings Prabhsimran Singh: पंजाब आणि लखनऊ यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात 24 वर्षीय प्रभसिमरनने तुफान खेळी केली. प्रभसिमरनने 48 चेंडूत 91 धावा केल्या, ज्यामध्ये 6 चौकार आणि 7 षटकार लगावले. प्रभसिमरनने केलेल्या खेळीच्या जोरावर पंजाबने 37 धावांनी हा सामना जिंकला.   

IPL 2024: वडिलांच्या दोन्ही किडनी खराब, आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस; तरीही IPL मध्ये धुमाकूळ घालतोय 24 वर्षीय खेळाडू

Punjab Kings Prabhsimran Singh: पंजाब आणि लखनऊ यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात 24 वर्षीय प्रभसिमरनने तुफान खेळी केली. प्रभसिमरनने 48 चेंडूत 91 धावा केल्या, ज्यामध्ये 6 चौकार आणि 7 षटकार लगावले. प्रभसिमरनने केलेल्या खेळीच्या जोरावर पंजाबने 236 धावांचा डोंगर उभा केला आणि 37 धावांनी हा सामना जिंकला. या संपूर्ण हंगामात प्रभसिमरन जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहे. पण मैदानात गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा प्रभसिमरन खासगी आयुष्यात मात्र मोठ्या संघर्षाचा सामना करत आहे. प्रभसिमरनच्या वडिलांच्या दोन्ही किडनी खराब असून, आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावी लागत आहे. 

प्रभसिमरन सिंहने आयपीएल 2025 मध्ये आपल्या जबरदस्त खेळीने फक्त क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलेलं नाही, तर आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानही आणलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सूरजीत सिंह यांची गिडनी फेल झाली असून प्रकृती गंभीर आहे. आठवड्यातून तीन वेळा त्यांना डायलिसीस करावं लागत आहे. आयुष्यातील या कठीण प्रसंगी मुलाच्या फलंदाजीने त्यांनी जणू संजीवनीच दिली आहे.

IPL 2025: रोहित शर्मा फिल्डिंग का करत नाही? मुंबई इंडियन्सने अखेर उघड केलं, 'मैदानात फक्त...'

 

प्रभसिमरनने या हंगामात आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 170 च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या खेळींचा समावेश आहे. सूरजित सिंह जेव्हा कधी टीव्हीवर मुलाला फलंदाजी करताना पाहतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं.

प्रभसिमरनने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "भारतासाठी खेळणं हे प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. माझंही हेच स्वप्न आहे. सतत मेहनत घेत एक दिवस भारताची जर्सी घालण्यासाठी मी मेहनत घेत आहे". प्रभसिमरनची फलंदाजी पाहता त्याचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असं दिसत आहे. 

'मी बाळाला दूध पाजून झाल्यानंतर...', शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा स्पष्टच बोलली, 'तीन वेळा प्रेग्नंट...'

2019 च्या आयपीएल हंगामात प्रभसिमरन सिंगला पंजाबने 60 लाखांच विकत घेतलं. त्यानंतर 2022 च्या लिलावात पंजाबने त्याला पुन्हा 60 लाखांत खरेदी केलं. तर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, प्रभसिमरनला पंजाब किंग्जने 4 कोटींमध्ये  कायम ठेवलं होतं. प्रभसिमरन सिंग 2023 च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध 65 चेंडूत 103 धावा काढून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. 

प्रभसिमरन सिंगच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. पण 2023 मध्ये तो या शतकासह फक्त एक अर्धशतक करु शकला होता. त्या हंगामात, प्रभसिमरनने 14 सामन्यांमध्ये 25.57 च्या सरासरीने आणि 150.42 च्या स्ट्राईक रेटने 358 धावा केल्या. आयपीएल 2024 मध्येही तो खास कामगिरी करु शकला नव्हता. मात्र या हंगामात तो जबरदस्त कामगिरी करत आहे. 

Read More