Sanju Samson : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार विकेटकिपर संजू सॅमसन (Sanju Samson) हा आगामी आयपीएल 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ सोडू इच्छितो. मीडिया रिपोर्ट्समधून 7 ऑगस्टला माहिती समोर आली की संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीला विनंती केली की त्यांनी एकतर त्याला दुसऱ्या संघात ट्रेड करावं किंवा मग संघातून ऑक्शनपूर्वी रिलीज करावं. संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सचा यशस्वी कर्णधार आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघ सोडू इच्छितो ही बातमी समोर आल्यावर 5 वेळा आयपीएल विजेता राहिलेला चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने सॅमसनला आपल्या संघात घेण्यासाठी स्वारस्य दाखवल आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार IPL 2025 नंतर संजू सॅमसनने चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगची सुद्धा भेट घेतली.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, '30 वर्षीय संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स उत्सुक आहे. ते संजूला ट्रेड करून किंवा कॅशच्या माध्यमातून आपल्या संघात घेतील. पण राजस्थान रॉयल्स संघ हा संजूच्या बदल्यात चेन्नई सुपरकिंग्सकडून दोन खेळाडूंची देवाणघेवाण करण्यास प्राधान्य देऊ शकतो'.
हेही वाचा : Asia Cup 2025 मधील भारत - पाकिस्तान सामना रद्द होणार? अधिकाऱ्याने केलं मोठं वक्तव्य
संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी केवळ चेन्नई सुपरकिंग्सचं नाही तर कोलकाता नाईटरायडर्स सुद्धा आग्रही आहे. कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले होते. पण त्याने श्रेयस अय्यरला रिटेन केलं नाही आणि आयपीएल 2025 हा सीरिन केकेआरसाठी फ्लॉप ठरला. कोलकाता नाइटराइडर्सने गेल्यावर्षी आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऑलराउंडर वेंकटेश अय्यरवर 23.75 कोटींची बोली लावून करारबद्ध केलं होतं. पण अय्यरवर लावलेला एवढा मोठा दावं त्यांच्यावर उलटा पडला. त्यांचा संघ या सीजनमध्ये फ्लॉप ठरला. केकेआरकडे कर्णधार पदासाठी प्रबळ खेळाडू नाहीये. संजू सॅमसनकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे, तेव्हा केकेआर सुद्धा संजूला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनच्या बदल्यात काय अपेक्षा करते?
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई सुपरकिंग्सकडून दोन खेळाडूंची देवाणघेवाण करण्यास प्राधान्य देऊ शकते. तसेच, CSK कॅश किंवा ट्रेडद्वारे सॅमसनला घेऊ शकते.
संजू सॅमसनला कोणत्या संघांनी स्वारस्य दाखवले आहे?
संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघांनी स्वारस्य दाखवले आहे.
संजू सॅमसनच्या ट्रेडबाबत अंतिम निर्णय कधी होऊ शकतो?
सध्या याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी किंवा ट्रेड विंडोदरम्यान याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.