IPL 2025 : भारत - पाकिस्तान तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 ही स्पर्धा 17 मे पासून पुन्हा एकदा सुरु झाली. शनिवारी स्पर्धेतील 58 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडणार होता. मात्र पावसामुळे या सामन्यावर पाणी फिरले आणि टॉस सुद्धा न होता सामना रद्द करण्याची वेळ आली. यामुळे विराटच्या आरसीबी संघाला फायदा झाला मात्र केकेआरचे मात्र नुकसान झाले. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सचा संघ थेट प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला.
आयपीएल 2025 मधील 58 वा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आरसीबी आणि केकेआर संघांना प्रत्येकी एक एक पॉईंट्स देण्यात आले. जर पाऊस न पडत आरसीबी हा सामना जिंकली असती तर त्यांचे 18 पॉईंट्स होऊन ते थेट प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकले असते. मात्र सामना रद्द झाल्याने पॉइंट्स टेबलमध्ये त्यांचे 17 पॉईंट्स झाले आहेत. आरसीबीने आतापर्यंत 12 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांचा नेट रनरेट +0.482 असून 17 पॉईंट्स सह ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सला 1 पॉईंट्स मिळाला असून त्यांच्या खात्यात सध्या 12 पॉईंट्स आहेत. केकेआरने 13 पैकी केवळ 5 सामन्यात विजय मिळवला आहे त्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. त्यामुळे केकेआरच प्लेऑफमधील आव्हान संपुष्ठात आलं असून ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाणारा चौथा संघ ठरले आहेत.
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यापूर्वी विराट टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्त झालेला आहे. विराट कोहलीला मानवंदना देण्यासाठी शनिवारी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध केकेआर सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या अनेक चाहत्यांनी विराटच्या नावाची पांढऱ्या रंगाची टेस्ट जर्सी परिधान केली होती. त्यामुळे चिन्नस्वामी पांढऱ्या रंगात रंगून गेलं होतं. मात्र पावसामुळे सामना न झाल्याने प्रेक्षकांची निराशा झाली.
हेही वाचा : रोहित शर्माचा धाकटा भाऊ नेमकं काय करतो? जगण्यासाठी करतोय 'हे' काम, डोंबिवलीशी खास कनेक्शन
आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे.
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने 12 सामन्यात 510 धावांची कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्या सूर्याकडे ऑरेंज कॅप आहे. तर गुजरात टायटन्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने 11 सामन्यात तब्बल 20 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आयपीएल 2025ची पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णाकडे आहे.