Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बॉलर-विकेटकीपरची जोरदार धडक अन् कॅच सुटला! विराट एवढा भडकला की...; वानखेडेवरचा Video Viral

IPL 2025 RCB Vs MI Virat Kohli Angry Video: अगदी निर्णायक क्षणी घातलेला हा गोंधळ आरसीबीला खरोखरच महागात पडला असता.

बॉलर-विकेटकीपरची जोरदार धडक अन् कॅच सुटला! विराट एवढा भडकला की...; वानखेडेवरचा Video Viral

IPL 2025 RCB Vs MI Virat Kohli Angry Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचं नशीब कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पालटलं आहे असं सोमवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर म्हटलं जात आहे. यामागील कारण म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर आरसीबीच्या संघाने मुंबईच्या बालेकिल्ल्यात विजयाची नोंद केली. याआधीचे सहाही सामने या मैदानामध्ये मुंबईकडून मात खाल्ल्यानंतर आरसीबीने सोमवारी फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी करत घरच्या संघाला धूळ चारली. मात्र या सामन्यामध्ये एका क्षणी सूर्यकुमार यादवसारख्या स्फोटक फलंदाजाचा झेल गोंधळामुळे सुटल्याने विराट कोहली प्रचंड चिडल्याचं पाहायला मिळालं. गोलंदाज आणि विकेटकीपरने एकमेकांना धडक दिल्याने हातात आलेला बॉल सुटून खाली पडला आणि विराटने संतापून थेट अपशब्द वापरत डोक्यावरील टोपी काढून जमीनीवर फेकली.

नक्की घडलं काय?

सामन्यातील 12 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव मोठा फटका मारायला गेला. बॉल त्याच्या बॅटच्या एजला लागून जागीच उंच उडाला. 27 धावांवर खेळत असलेला सूर्यकुमार बॉल जागेवरच उंच उडाल्यानंतर आता आपण बाद होणार असा चेहरा करत निराश झाला आणि रन काढण्यासाठी नॉन स्ट्राइकर्स एण्डला पळाला. दुसरीकडे मधल्या स्टम्पवर टाकलेला हा स्लो बॉल टोलावताना मिस टाइम झाल्याने हवेत उंच उडाल्याचं पाहून तो झेलण्यासाठी एकीकडून विकेटकीपर जितेश शर्मा आणि दुसरीकडून गोलंदाज यश दयाल धावत आला.

दोघांचीही पीचच्या मध्यभागी धडक बसली. खरं तर बॉल यशच्या हातात स्थिरावला होता. मात्र जितेशची धडक बसल्याने बॉल हातातून उडून खाली पडला आणि दोन्ही खेळाडू मैदानावर पडले. गोलंदाज आणि विकेटकीपर दोघेही बराच वेळ मैदानावर पडून होते. अखेर फिजिओ मैदानावर आले त्यांनी दोघांना तपासलं आणि ते पुढे खेळू शकतात असं निश्चित झाल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला. हा सोडलेला कॅच पाहून विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. दुसरीकडे कॉमेंट्री बॉक्समधून सुनिल गावसकरांनी अशावेळेस खेळाडूंनी एकमेकांना सांगणं अपेक्षित असतं आणि हे प्रशिक्षकांनी शिकवायला हवं असं विधान करत समोरचा प्रकार पाहून नाराजी व्यक्त केली. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ....

1)

2)

सूर्याला संधीचं सोनं करण्यात अपयश

मात्र सूर्यकुमारला या जिवनदानाचा फारसा वापर करता आला नाही. याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव षटकार मारण्याच्या नादात लियाम लिविंगस्टनकडे झेल देऊन बसला. ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेला स्लो चेंडू सूर्यकुमारला कव्हर्सवरुन मारायचा होता. मात्र चेंडू फारसा लांब गेला नाही आणि शॉर्ट कव्हर्समध्ये साइड ऑनवरुन धावत येत लिविंगस्टनने उत्तम झेल घेतला. सूर्यकुमार 26 बॉलमध्ये 28 धावा करुन बाद झाला.

Read More