IPL 2025 RCB vs RR Virat Kohli Video: इंडियन प्रिमिअर लीगच्या 27 व्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विराट कोहलीने नाबाद 62 धावांची खेळी करत संघाला 9 विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. विराटने 45 चेंडूंमध्ये 62 धावांची खेळी करत 174 धावांचा यशस्वी पाठलाग केला. आरसीबीने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा हा सामना 15 चेंडू शिल्लक असतानाच जिंकला. राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना दुपारच्या सत्रात झाला. त्यामुळे मैदानावरील उन्हाचा विराट कोहलीलाही त्रास झाल्याचं दिसून आलं.
उन्हामुळे विराटला त्रास झाल्याने त्याने क्षणभऱ विश्रांती घेत मोठा श्वास घेतला. विराटची ही अवस्था पाहून अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. विशेष म्हणजे विराटला श्वास पुरत नाही की काय असं वाटत असताना चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली असतानाच विराटनेही राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला आपल्या हृदयाचे ठोके तपासण्यास सांगितलं.
नक्की वाचा >> IPL 2025: ...म्हणून रविवारी RCB ची टीम लालऐवजी हिरव्या जर्सीत मैदानात उतरली; खरं कारण समोर
दुसऱ्या डावातील 15 व्या ओव्हरमध्ये विराटला धाप लागली. वानिंदू हसरंगाच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर विराटने दोन धावा पळून काढल्या. विराट दोन धावा काढून पुन्हा फलंदाजीसाठी स्टाइकर्स एण्डला पोहोचला. मात्र दोन धावा काढल्यानंतर विराटला धाप लागली. तो खेळपट्टीवरुन बाजूला गेला. थोडा कंबरेत वाकला. अपुरा पडत असलेला श्वासाची गती सामान्य होईपर्यंत थांबला. त्यानंतर तो चालत स्टम्पकडे आला. तिथे आल्यानंतरही विराटने राजस्थानचा कर्णधार आणि विकेटकिपर संजू सॅमसनला छातीवर हात ठेऊन आपल्या हृदयाचे ठोके तपासण्यास सांगितलं.
SANJU SAMSON CHECKING VIRAT KOHLI'S HEARTBEAT.
— Tanuj (@ImTanujSingh) April 13, 2025
- Such a Lovely Moment..!!!! pic.twitter.com/QCRxKzFnbJ
स्टम्प माईकमध्ये विराटने संजूला, "जरा, माझी हार्टबीट्स चेक कर" असं सांगितल्याचं रेकॉर्ड झालं आहे. त्यानंतर संजूने ग्लोज काढून विराटच्या छातीवर हात ठेवत हृदयाचे ठोके तपासून पाहिले आणि तो विराटला, "ठीक आहेत," असं सांगितलं. हा सारा प्रकार कॅमेरात कैद झाला असून आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Virat was struggling bit with health in the middle hopefully nothing seriouspic.twitter.com/NoSbyqhTpx
— (@Sneha4kohli) April 13, 2025
15 वी ओव्हर संपल्यानंतर विराट आणि आरसीबीच्या संघाने फलंदाजांना आराम मिळावा म्हणून स्टॅटर्जिक टाइम आऊट घेतला. आरसीबीच्या संघाने विजय मिळवल्यानंतर संजून सॅमसनने विराट कोहली आणि फिलिप सॉल्टच्या फलंदाजीसमोर राजस्थानचे गोलंदाज निष्प्रभ ठरल्याची प्रांजळ कबुली दिली. विराट आणि सॉल्टने एकत्र 92 धावांची सलामीची भागिदारी केल्याने बंगळुरुला विजय सहज शक्य झाला. बंगळुरुच्या संघाचा हा या स्पर्धेतील चौथा विजय असून चारही विजय त्यांनी घरच्या मैदानावरुन बाहेर खेळताना मिळवले असून आतापर्यंत झालेले दोन्ही पराभव हे मात्र घरच्या मैदानावर झाले आहेत.