Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ऋषभ पंतचं शतक आणि दमदार सेलिब्रेशन; संजीव गोयंकांनी एका शब्दात संपवला विषय!

Sanjiv Goenka Reaction:  पंत लवकर बाद होताना प्रत्येक वेळी संजीव गोयंकाच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

ऋषभ पंतचं शतक आणि दमदार सेलिब्रेशन; संजीव गोयंकांनी एका शब्दात संपवला विषय!

Sanjiv Goenka Reaction On Rishabh Pant Century Celebration: आयपीएल 2025 च्या हंगामात ऋषभ पंतची टीम लखनऊ सुपर जायंट्सला त्याच्याकडून खूप आशा होत्या. LSG ने त्याला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवून मोठी कामगिरी केली होती. पण ऋषभ  या सिझनमध्ये टीमच्या तसेच चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्याने पहिल्या 12 डावात फक्त 151 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट 107.09 होता. पंत लवकर बाद होताना प्रत्येक वेळी संजीव गोयंकाच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण पंतच्या सेंच्युरीवेळी गोएंका स्टेडियममध्ये नव्हते? पंतच्या सेंच्युरी सेलिब्रेशननंतर गोएंकांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरलीय. 

स्ट्राईक रेट 200 च्या आसपास 

पंतचा हंगाम खूप वाईट गेला पण शेवटच्या लीग सामन्यात त्याने जबरदस्त पुनरागमन केले आणि नाबाद 118 धावा केल्या. जे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे आयपीएल शतक होते. या शतकानंतर पंतचे दमदार सेलिब्रेशन आणि संजीव गोयंकाच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण हंगामात पंत लयीत दिसला नाही. त्याच्या संथ फलंदाजीचाही लखनौ टीमवर परिणाम झालेला दिसला. पण गेल्या सामन्यात त्याने संपूर्ण हंगामाची कसर भरुन टाकली. पंतने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळ केला आणि दुसऱ्या विकेटसाठी मिशेल मार्शसोबत 152 धावांची भागीदारी केली. त्याचा स्ट्राईक रेट 200 च्या आसपास होता आणि त्याने प्रत्येक दिशेने शॉट्स मारले.

 61 चेंडूत 118 धावा

भुवनेश्वर कुमारने मिशेल मार्शला बाद करून ही भागीदारी मोडली. पण पंतने आपला हल्ला सुरू ठेवला आणि 7 वर्षांनंतर पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. ऋषभने याआधी 2018 मध्ये दिल्लीसाठी शेवटचे शतक ठोकले होते.  ऋषभने 61 चेंडूत 118 धावा केल्या. ज्यामध्ये 8 षटकार आणि 11 चौकार होते. या शतकानंतर आनंद साजरा करण्यासाठी त्याने मैदानावर अ‍ॅक्रोबॅटिक्स दाखवले. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

संजीव गोयंकांची बोलकी प्रतिक्रिया

ऋषभ पंतचे हे शतक पाहण्यासाठी एलएसजीचे मालक संजीव गोयंका स्टेडियमवर दिसले नाहीत. पण पंतच्या शतकानंतर संजीव गोयंका यांनी इंस्टाग्रामवर त्याचे कौतुक केले. त्यांनी सोशल मीडियावर एका शब्दात स्वतःचे प्रतिक्रिया नोंदवत 'पॅन्टास्टिक 'पॅन्टास्टिक!' असे लिहिले. त्यांनी शतकानंतर पंतच्या उन्हाळी सेलिब्रेशनचे फोटो देखील शेअर केले.

 क्वालिफायर-1 मध्ये पंजाबशी सामना

पंतचे शतक आणि एलएसजीने 228 धावा केल्या असूनही आरसीबी टीम जिंकली. आरसीबीकडून सर्वात शानदार खेळी कर्णधार जितेश शर्माची होती. त्याने फक्त 33 चेंडूत 85 धावा केल्या आणि लक्ष्य गाठले. आरसीबीने 18.4 षटकांत 4 गडी गमावून 230 धावा केल्या. या विजयासह आरसीबीने प्लेऑफमध्ये टॉप-2 मध्ये स्थान मिळवले. आता आरसीबीला 29 मे रोजी क्वालिफायर-1 मध्ये पंजाबचा सामना करायचाय.

Read More