Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

LSG पंत सोबतचा करार करणार रद्द? दाव्यांवर ऋषभ पंतचा मोठा खुलासा

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये ऋषभ पंत 12 सामन्यांमध्ये केवळ 135 धावा करू शकला. पंतच्या खराब प्रदर्शनामुळे लखनऊ सुपर जाएंट्स पुढील वर्षी ऋषभ पंतला रिलीज करेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला होता. 

LSG पंत सोबतचा करार करणार रद्द? दाव्यांवर ऋषभ पंतचा मोठा खुलासा

IPL 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंत हा सर्वात चर्चेचा विषय बनला होता. लखनऊ सुपर जाएंट्सने लखनऊला तब्बल 27 कोटींना करारबद्ध केलं होतं. मात्र दुर्दैवानं अपेक्षेप्रमाणे ऋषभ पंत आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) खास कामगिरी करू शकला नाही, तसेच पंतच्या नेतृत्वात खेळणारी लखनऊ सुपर जाएंट्स प्लेऑफमधून बाहेर पडली. आयपीएल 2025 मध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) 12 सामन्यांमध्ये केवळ 135 धावा करू शकला. पंतच्या खराब प्रदर्शनामुळे लखनऊ सुपर जाएंट्स पुढील वर्षी ऋषभ पंतला रिलीज करेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला होता. यावर स्वतः ऋषभ पंतने सोशल मीडियावर पोस्ट करून महत्वाची माहिती दिली आहे.  

ऋषभ पंतबाबत मोठा दावा : 

मागील काही वर्षांपासून ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये लखनऊने पंतवर 27 कोटींची रेकॉर्ड ब्रेक बोली सुद्धा लावली. त्यामुळे ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. परंतु एवढी मोठी किंमत मिळून सुद्धा पंतचा आयपीएल 2025 मधील परफॉर्मन्स फ्लॉप ठरला. त्यानंतर ऋषभला ट्रोल करण्यात आलं आणि सारखं त्याच्यावर लागलेली मोठी बोली आणि त्याच्या टी 20 फॉरमॅटमधील खेळीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.  लखनऊचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला, एका पत्रकाराने सोशल मीडियावर लखनऊ सुपर जाएंट्स पुढील सीजनमध्ये ऋषभ पंतला रिलीज करेल असे म्हटले. या पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला की  पंतचा या सीजनमधील परफॉर्मन्स पाहता त्याला दिली जाणारी 27 कोटींची रक्कम खूप जास्त आहे. 

हेही वाचा : Points Table मध्ये टॉपवर फिनिश करू शकते मुंबई इंडियन्स, कसं आहे समीकरण?

 

ऋषभ पंतला आला राग : 

लखनऊ सुपर जाएंट्स प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर ऋषभ पंत सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरला. तसेच वाईट परफॉर्मन्समुळे त्याच्याकडून 27  कोटी रुपये काढून घेण्यात येणार असा दावा केला जात असल्याने ऋषभ पंत भडकला. त्याला सोशल मीडियावर पोस्ट लिहीत म्हटले की, 'मला माहितीये खोट्या बातम्यांनी कंटेंटला जास्त रिच मिळतो, पण त्यालाच सर्व काही मनू नका. अजेंडा असणाऱ्या फेक बातम्यांपेक्षा थोडीशी समज आणि योग्य बातमी दिली तर खूप चांगले होईल. धन्यवाद तुमचा दिवस चांगला जावोत. सोशल मीडियावर जे काही पोस्ट करता त्याबाबत थोडे जबाबदार आणि समजूतदार राहा. 

आयपीएल 2025 ला सुरुवात होण्यापूर्वी  लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका यांना त्यांच्या संघाकडून आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वावर मोठी आशा होती. ते म्हणाले होते की, 10 वर्षांनंतर पंतचे नाव एमएस धोनी आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांसोबत घेतले जाईल.

 

Read More