IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ प्रशिक्षकांच्या रडारवर आहे. आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्मा अजिबात फॉर्ममध्ये नाही. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात रोहित शर्माने 0, 8 आणि 13 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा संघाला स्फोटक सुरुवात करुन देण्याची अपेक्षा असताना, मात्र सतत अपयशी ठरत आहे. तीनपैकी एक सामना जिंकत मुंबई इंडियन्स संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात तिसरा सामना जिंकण्याआधी मुंबईने पहिले दोन्ही सामने गमावले. त्यातच आता शुक्रवारी मुंबई लखनऊ सुपरजायंट्स संघाशी भिडणार आहे.
या सामन्याआधी रोहित शर्मा आणि लखनऊ संघाचा मेंटॉर झहीर खान यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ऋषभ पंत रोहित शर्माला मागून मिठी मारताना दिसत आहे. मात्र त्याने मिठी मारण्याआधी रोहित शर्मा झहीर खानशी जे बोलत होता ते कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यामध्ये रोहित शर्मा झहीर खानला सांगत आहे की, "मला जे करायचं होतं, ते मी ठीक केलं आहे. आता मला काही करण्याची गरज नाही".
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी या संभाषणाचा आपल्या परीने अर्थ लावला आहे. लखनऊविरोधातील सामन्याआधी सर्वांच्या नजरा मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्मावर असणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत रोहित शर्मा झगडताना दिसत असून, त्याला सूर गवसणार की नाही हे पाहावं लागणार आहे.
Q: For how long are you going to watch this reel?
— Mumbai Indians (@mipaltan) April 3, 2025
A: Haaanjiiii #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #LSGvMI pic.twitter.com/e2oxVieoz2
लखनऊ आणि मुंबई हे दोन्ही संघ सध्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी संघर्ष करत आहे. दोन्ही संघांनी एकच सामना जिंकला असून, दोन सामन्यात पराभव झाला आहे. त्यातच आता शुक्रवारी लखनऊ आणि मुंबई संघ भिडणार आहेत. चॅम्पिअन्स ट्रॉफी विजयानंतर फार अपेक्षा असणाऱ्या रोहित शर्माने 7 च्या सरासरीने 21 धावा केल्या आहेत. 13 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
यादरम्यान रोहितबद्दल एक आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे, परंतु गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये निराशाजनक निकाल दिले आहेत. त्याने 2017 पासून फक्त दोनदाच एका हंगामात 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे, 2019 मध्ये (दोन अर्धशतकांसह 15 सामन्यांमध्ये 405 धावा) आणि 2024 मध्ये (14सामन्यांमध्ये एका शतक आणि एका अर्धशतकासह ४१७ धावा) केल्या आहेत.
ESPNCricinfo नुसार, 2017 पासून, 15 खेळाडूंनी लीगमध्ये किमान 2500 धावा केल्या आहेत. त्यापैकी, रोहितचा सर्वात कमी स्ट्राईक रेट (130.09) आहे. 2017 पासून 118 सामन्यांमध्ये, रोहितने फक्त 25 च्या सरासरीने आणि 130 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 2775 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 117 डावांमध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकं आहेत आणि सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 105 आहे.