Rohit Sharma IPL 2025 : आयपीएलचा (IPL 2025) यंदाचा हंगाम या न त्या कारणांमुळं चर्चेत असून आता पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे (Mumbai Indians) मुंबई इंजडियन्समधील हक्काचा खेळाडू रोहित शर्मा. (Gujrat Titans) गुजरात टायटन्स या संघासोबतच्या सामन्यापूर्वी हा रोहित आणि संघातील इतरही खेळाडू मैदानावर सराव करताना दिसले. इथं फक्त सराव झाला, असंच तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज आहे. कारण, खेळाच्या सरावासोबतच खेळाडूंनी मैदानात काही मजेशीर क्षणांचाही आनंद घेतला.
अशाच काही मजेशीर क्षणांचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आला. MI TV च्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा चक्क क्रिकेट खेळत नसून त्याची फोटोग्राफीची कौशल्य दाखवताना दिसला. बरं, इतकंच नव्हे तर सवयीचाच भाग असावा अशा सराईतासारखा तो मध्येच मराठीच बोलू लागला.
मैदानातील रोहितचा हा अंदाज पाहून अर्थातच मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी या हाडाच्या मुंबईकर खेळाडूचं तोंड भरून कौतुक केलं. सरावादरम्यान रोहितनं गुजरातच्या संघाचा प्रशिक्षक आणि इतर सहाय्यकांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. ही मंडळी 'डेडली ग्रुप' आहेत असं म्हणत तो मराठीतूनच त्याची ही ऑफ फिल्ड कॉमेंट्री देताना दिसला.
Presenting the Deadly Cameraman - Rohit Sharma #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #GTvMI pic.twitter.com/U0UsNixb3k
— Mumbai Indians (@mipaltan) March 28, 2025
हातात कॅमेरा घेऊन रोहित म्हणाला, 'अरे तुझाच वेट करतोय. तू पण जा तिकडे...डेडली ग्रुप आहे हा...आशिष नेहरा, सत्यजीत परब, पार्थिव पटेल आणि विक्रम सोलंकी...जा ना तिकडे.. जा ना एक फोटो काढायचा आहे तुमचा'. रोहितचा हा अंदाज MI च्या सोशल मीडियावरून शेअर करताना 'सादर करत आहोत डेडली कॅमेरामन... रोहित शर्मा' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं. बस्स.... मग काय? शेअर होताच शॉर्ट्स म्हणू नका किंवा रील्स जिथेतिथे रोहित आणि त्याचा हा अंदाजच व्हायरल झाला. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का?