IPL 2025 : आयपीएल 2025 चा फायनल सामना पंजाब किंग्स विरुद्ध आरसीबी (PBKS VS RCB) यांच्यात पार पडत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करून पंजाबला 191 धावांचे आव्हान दिले. पंजाबच्या गोलंदाजांनी 9 विकेट घेऊन आरसीबीला 190 धावांवर रोखलं. या सामन्यात 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या फिल सॉल्टची कॅच घेण्यात श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) यश आले ही आरसीबीची फायनलमधील पहिलीच विकेट होती. तेव्हा श्रेयसने घेतलेला अप्रतिम कॅच पाहून प्रीती झिंटाने स्टँडमध्ये जोरदार सेलिब्रेशन केलं.
पंजाब किंग्सचा गोलंदाज काइल जेमिसनने फिल सॉल्टला दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल टाकला. फिल सॉल्टने यावर जोरदार शॉट खेळला, परंतु कर्णधार श्रेयस अय्यरने उत्कृष्ट फिल्डिंग करून ही कॅच पकडली. आरसीबीची ही पहिली विकेट होती, ज्यामुळे पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटाने उत्साहित होऊन टाळ्या वाजवल्या. या कॅचवर प्रीती झिंटाची रिऍक्शन सोशल मीडियावर व्हायरल होतेय. पंजाब किंग्सला आयपीएलच्या मागील 18 वर्षात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. पंजाब किंग्सची मालकीण प्रीतीने मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यरवर 26.75 कोटींची बोली लावून त्याला पंजाब संघाशी करारबद्ध केलं होतं. प्रीती जवळपास प्रत्येक सामन्यात पंजाब किंग्सला सपोर्ट करताना दिसते.
हेही वाचा : IPL Final: पंजाबच जिंकणार! प्रसिद्ध गायकाने लावली तब्बल 3 कोटींची पैज, स्वतः दिली माहिती
That Grab. That Roar
— IndianPremierLeague (IPL) June 3, 2025
Relive Shreyas Iyer's excellently judged catch to dismiss Phil Salt early on in the chase TATAIPL | RCBvPBKS | Final | TheLastMile | ShreyasIyer15
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने फायनल सामन्यापूर्वी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच आरसीबीला फलंदाजीचं आव्हान दिलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 चं स्थान मिळवलं.
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार व्यास, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल