Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पंजाबच्या मालकाने Excitement मध्ये घेतला श्रेयसचा Kiss; संतापून श्रेयसनं...; पाहा Video

IPL 2025 Shreyas Iyer Kiss Video: मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर हा सारा प्रकार घडला असून घटनाक्रम कॅमेरात कैद झालाय.

पंजाबच्या मालकाने Excitement मध्ये घेतला श्रेयसचा Kiss; संतापून श्रेयसनं...; पाहा Video

IPL 2025 Shreyas Iyer Kiss Video: पंजाब किंग्जसचा कर्णधार श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मुंबईविरुद्धचा क्वालिफायर-2 मधील सामन्यात दमदार कामगिरीच्या जोरावर संघाला विजय मिळून देत 11 वर्षानंतर पहिल्यांदाच पंजाबच्या संघाला फायनल्समध्ये घेऊन गेल्यानंतर हॉटेलवर श्रेयसचं जंगी स्वागत झालं. मात्र या सेलिब्रेशनदरम्यान भावनेच्याभरात पंजाबच्या मालकांपैकी एक असलेल्या नेस वाडिया यांनी असं काही केलं की श्रेयस थोडा चिडलेला दिसून आला.

श्रेयसची दमदार फलंदाजी अन् पंजाबचा विजय

श्रेयस अय्यरने मुंबईविरुद्धच्या सामन्यात दमदार फटकेबाजी करत 204 धावांचं टार्गेट एक ओव्हर आधीच पूर्ण केलं. श्रेयसने आपल्या खेळीमध्ये 41 चेंडूंमध्ये नाबाद 87 धावा केल्या. त्याने यामध्ये 8 षटकार आणि चार चौकार लगावले. श्रेयसची खेळी पाहून अनेकजण थक्क झाले. त्याच्या या आत्मविश्वासपूर्ण खेळीमुळेच पंजाबला सहज विजय मिळवता आला. सामन्यानंतर सर्वच स्तरातून श्रेयसचं कौतुक होताना दिसतंय. श्रेयस आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या टीमला अंतिम सामन्यात घेऊन जाणारा पहिलाच कर्णधार ठरला. श्रेयसच्या या कामगिरीनंतर त्याचं टीमकडून हॉटेलमध्ये जंगी स्वागत झालं.

नेमकं घडलं काय?

श्रेयस हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा केक कापून श्रेयसला भरवण्यात आला. संघाचे सहमालक नेस वाडिया हे सुद्धा हॉटेलमध्ये श्रेयसचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. श्रेयसने सेलिब्रेशनचा केक कापल्यानंतर नेस वाडिया पुढे आले आणि त्यांनी केकचा एक घास श्रेयसला भरवला. मात्र त्यानंतर नेस वाडियांनी श्रेयसचं कौतुक करताना चक्क त्याच्या गालावर किस केलं. अगदीच अनपेक्षितपणे नेस वाडियांनी हे केल्याने श्रेयस थोडा थबकला. मात्र तो यावर व्यक्त झाला नाही. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नव्हते. पण काही क्षणांनंतर त्याने केकसोबत ठेवण्यात आलेल्या टीश्यू पेपरमधील एक पेपर उचलून नेस वाडियांनी ज्या ठिकाणी किस केलं तो भाग पुसल्याचं पाहायला मिळालं. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

या तीन संघांना फायनलमध्ये घेऊन गेलाय श्रेयस

आज पंजाबचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये बंगळुरुविरुद्ध मैदानात उतरणार असून आज या दोघांपैकी कोणीही विजेता झाला तरी आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार आहे. यापूर्वी श्रेयसने दिल्लीच्या संघाला फायनलपर्यंत नेलेलं. मात्र त्यावेळी मुंबईने चषक जिंकलेला. त्यानंतर 2024 चं आयपीएल कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने श्रेयसच्या नेतृत्वाखालीच जिकलं होतं. आता श्रेयस पुन्हा पंजाबला पहिलं जेतेपद मिळवून देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read More