Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अभिषेकने मैदानातच खिशातून काढून झळकावलेली चिठ्ठी काव्य मारनसाठी? लिहिलेले अवघे 6 शब्द

IPL 2025 SRH vs PBKS Abhishek Sharma Special Note: सोशल नेटवर्किंगवर या चिठ्ठीचे फोटो व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिषेकने मैदानातच खिशातून काढून झळकावलेली चिठ्ठी काव्य मारनसाठी? लिहिलेले अवघे 6 शब्द

IPL 2025 SRH vs PBKS Abhishek Sharma Special Note: 14 फोर, 10 सिक्स, 55 बॉलमध्ये 141 धावा... ही कामगिरी आहे भारताचा 24 वर्षीय फलंदाज अभिषेक शर्माची! सनरायझर्स हैदराबादच्या संघाने शनिवारी हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडियमवर केलेल्या कामगिरीमध्ये मोलाचं योगदान देणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. या सामन्यामध्ये 245 धावांचा पाठलाग करताना 8 विकेट आणि 9 चेंडू राखून सनरायझर्सच्या संघाने सामना खिशात घातला. मात्र सामन्यातील खेळाबरोबर चर्चेत राहिली ती अभिषेकने शतक झळकावल्यानंतर खिशातून बाहेर काढून झळकावलेली चिठ्ठी!

पंजाबच्या कर्णधाराचा उत्तम खेळ

सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारा पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी उत्तम फटकेबाजी केली. प्रियांश आर्याने 13 बॉलमध्ये 36 धावा केल्या. प्रभासिमरन सिंगने 23 बॉलमध्ये 42 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 36 बॉलमध्ये 82 धावांची खेळी केली. त्याला 22 बॉलमध्ये 27 धावा करत निहाल वधेरा आणि 11 बॉलमध्ये नाबाद 24 धावा करत उत्तम साथ दिली. पंजाबच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 245 धावांपर्यंत मजल मारली. मागील काही सामन्यांमधील सनरायझर्सची कामगिरी पाहता हा सामना आता पंजाबच जिंकणार असं वाटतं होतं. मात्र अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी शिजत होत्या.

नुसती फटकेबाजी

धावांचा पाठलाग करताना अगदी सुरुवातीपासूनच सनरायझर्सच्या दोघन्ही सलामीवीरांनी आक्रमक खेळ केला. अभिषेकने आपल्या क्लिन हिटींगच्या जोरावर म्हणजेच उत्तम फटकेबाजीच्या मदतीने 256.36 च्या सरासरीने 55 बॉलमध्ये 141 धावा केल्या. अभिषेकच्या फटकेबाजीचं उत्तर पंजाबच्या गोलंदाजांना सापडत नव्हतं. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादाचा दुसरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनेही तुफान फलंदाजी केली. हेडने 37 चेंडूंमध्ये 66 धावा केल्या. हेडने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. अभिषेक आणि हेडने 12.2 ओव्हरमध्ये 171 धावांची सलामी दिली. अवघ्या 40 बॉलमध्ये अभिषेक शर्माने शतक झळावलं. अभिषेकने शतक झळकावल्यानंतर सनरायर्सच्या मालकीण काव्या मानरही आनंदाने उड्या मारताना दिसल्या.

पॅण्टच्या खिशातून काढली ती चिठ्ठी

सहावं सर्वात वेगवान शतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माने आपल्या पॅण्टच्या खिशातून एक चिठ्ठी बाहेर काढत झळकावली. ही चिठ्ठी संघ मालकीण काव्या मारनच्या दिशेनं झळकावल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. अभिषेकने ज्या दिशेने चिठ्ठी झळकावली त्याच बाजूला संघाचा डगआऊट होता. तसेच चिठ्ठीवरील मजकूर पहिल्यास तो संघासाठीच असल्याच स्पष्ट होतं असल्याने ही चिठ्ठी काव्या मारन यांच्यासाठी नाही तर संघासाठी असल्याचं स्पष्ट झालं. मैदानात ही चिठ्ठी उघडून पाहण्याचा मोह पंजाबचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरलाही आवरला नाही.

चिठ्ठीत काय लिहिलं होतं?

या चिठ्ठीमध्ये 'This One Is For Orange Army' असं वाक्य लिहिलेलं होतं. म्हणजेच ही खेळी आपल्या संघासाठी समर्पित केलेली आहे, असं अभिषेकला सांगायचं होतं. 

चिठ्ठीचं रहस्य हेडने सांगितलं

या चिठ्ठीबद्दल नंतर ट्रॅव्हिस हेडने खुलासा करताना मागील सहा सामन्यांपासून ही चिठ्ठी अभिषेकच्या खिशात होती. मात्र त्याला सातत्याने अपयश येत होतं. म्हणूनच पंजाबाविरुद्ध दमदार खेळी केल्यानंतर त्याने अखेर सहा सामन्यानंतर ही चिठ्ठी मैदानात खिशाबाहेर काढून संघ सहकाऱ्यांना दाखवली. 

पॉइण्ट्स टेबलमध्ये दोन स्थानांनी वर आला सनरायझर्सचा संघ

या विजयामुळे पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असलेला सनरायझर्सचा संघ आठव्या स्थानी गेला आहे. मुंबईचा संघ नवव्या तर चेन्नईचा संघ सध्या दहाव्या स्थानी आहे. 

Read More